मुंबई : आतापर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर आपण चॅटींगसाठी करत होतो. लवकरच आता याद्वारे पैसे ही पाठवता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्हॉट्सअॅपला मनी ट्रान्सफर सर्व्हिससाठी मंजूरी दिली आहे. याद्वारे कोणत्याही खात्यातील धारकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) मध्ये पैसे ट्रांसफर करता येईल. हा पहिला मोबाईल अॅप असेल जो डिजिटल पेमेंटसाठी मल्टी बँक पार्टनरशिपसोबत काम करेल.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअॅपने जूनमध्ये इंस्टेट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केली. व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे इंस्टेट मेसेज डिलीवर होते त्याचप्रमाणे दोन खाताधारकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येईल. तसेच व्हीचॅट आणि हाईक मेसेजिंग अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसलाच सपोर्ट करतात. परंतु याचा सर्वांत जास्त फायदा व्हॉट्सअॅपलाच होईल. कारण व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि २० कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत.

लवकरच गुगलही बँकेबरोबर पार्टनरशिप करून पेमेंट सर्विस सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गुगलला आरबीआयकडून मान्यता मिळणे बाकी आहे. २०१६ मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआई सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाईल युजर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.