मुंबई : टू व्हिलर (Two Wheeler) वाहन कंपनी पियाजिओ व्हेस्पाने (Piaggio Vespa) बाजारात दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत. व्हेस्पाने उद्योगविश्वात 75 वर्षे पूर्ण केली आहेत. या खासप्रसंगी दोन नवीन आकर्षक मॉडेल्स बाजारात दाखल केली आहेत. दोन्ही नवीन मॉडेल्स ग्राहकांना पसंत पडतील, असा कंपनीचा दावा आहे. (Piaggio celebrates Vespa's 75th anniversary with special edition models)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पियाजिओ व्हेस्पाने (Piaggio Vespa) ही स्कूटर डायमंड फिनिशसह लॉन्च केली आहे. GTSची सीट लेदरची बनलेली आहे आणि या स्कूटरच्या लूककडे खास लक्ष दिले आहे. आमची सहयोगी साइट 'झी न्यूज'च्या वृत्तानुसार, पियाजिओ व्हेस्पाच्या जीटीएस व्हेरिएंटमध्ये करड्या रंगाची व्हील्स  दिली गेली आहेत. स्टँडर्ड व्हेरिएंटप्रमाणेच या स्पेशल व्हेरिएंटमध्ये रियर व्यू मिरर,  (Rear View Mirror), इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Instrument Cluster), लगेज रॅकसुद्धा (Luggage Rack) आहे. बाजारात याची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.


इटालियन ऑटो कंपनी पियाजिओनेही आपल्या वेस्पा ब्रँडसह  Primaveraलाही बाजारात लॉन्च केली आहे. जीटीएस 300 च्या तुलनेत त्याची किंमत खूपच कमी आहे. Primaveraची एक्सरूममध्ये किंमत सुमारे 95,000 रुपये आहे.


Vespa च्या स्पेशल एडिशन स्कूटरबरोबरच कंपनी वेलकम किटही देत ​​आहे. स्कूटर खरेदी करता तेव्हा या वेलकम किटमध्ये आपल्याला एक रेशीम स्कार्फ, एक विेंटेज स्टील व्हेस्पा प्लेट आणि आठ पोस्टकार्ड देण्यात येत आहे. यात आठ वर्षांच्या व्हेस्पाचा इतिहास सांगितला गेला आहे..


60 च्या दशकात प्रथमच Vespaने बजाज ऑटोबरोबर भारतीय बाजारात सुरुवात केली आहे. त्यानंतर 80 च्या दशकात पुन्हा कंपनीने LML मोटर्स भागीदारी केली. मात्र, वादानंतर 1999 मध्ये ही भागीदारी संपुष्टात आली.