Chat GPT Vs Bard : गुगल म्हणजे सर्च इंजिनचा बादशाह. गुगलला टक्कर देणं कोणालाही जमलं नाही. बड्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय. मात्र, आता गुगलने थेट चॅटजीपीटी ला टक्कर देण्यासाठी एक भन्नाट पर्याय निवडला आहे. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलनं आपली स्वत:ची एआय (Artificial Intelligence) आधारीत चॅटबॉट सेवा बार्ड (Bard) ही यंत्रणा विकसित केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्ड (Google Bard) या सेवेची चाचणी गुगलने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. ही सेवा चॅटजीपीटीपेक्षाही हायटेक असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी वर्तविला आहे. येत्या काही आठवड्यात बार्डची प्राथमिक चाचणी विश्वसनीय युजर्ससोबत केली जाणार आहे, अशी माहिती सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी दिली आहे. ब्लॉगमधून पिचाई यांनी संदर्भात माहिती दिलीये.


ChatGPT म्हणजे काय?


ChatGPT म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट Chat GPT सादर केलाय. चॅट GPT ला ट्रेन करण्‍यासाठी, विकसकांनी सार्वजनिकपणे उपलब्‍ध डेटा गोळा केला आहे आणि तो फीड केलाय. ChatGPT लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत युजर्सची संख्या शुन्यावरून 100 मिलियनवर पोहोचली आहे.


LaMDA ने सुसज्ज Bard -


Bard या यंत्रणेचा उल्लेख करताना LaMDA हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. Bard ही यंत्रणा गुगलच्या लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन (Language Model for Dialogue Application) अर्थात LaMDA ने सुसज्ज असल्याने ही यंत्रणा अधिकच प्रभावशाली असणार आहे.


बार्ड (Bard) म्हणजे काय?


बार्ड (Bard) म्हणजे एक आदिवासी कवी, गायक, नायक आणि त्यांच्या कृतींवर श्लोक तयार करण्यात आणि पाठ करण्यात कुशल होते. वापरकर्त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी गुगलने आपला एआय चॅटबॉटही विकसित केला असून त्याला बार्ड असं नाव देण्यात आलंय.


आणखी वाचा - Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?


बार्ड  (Bard) सर्वाधिक अचूक उत्तर देऊ शकतो. सोबत ही गूगलने सांगितलं आहे की, बार्डला मोठं लॅंग्वेज मॉडेल पावर, बुद्धिमत्ता आणि रचनात्मकता संयोजना पासून चालेल. फक्त तो ही नाही बार्डला असं डेवलप केलं जात आहे की हे टूल आधार ग्राहक फीडबॅक आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीसाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी वापरला जाईल.