Google Play Store Update: गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर अनेक अंड्रॉईड मोबाइल्समधून Play Store चा सपोर्ट निघून जाणार आहे. पण यामध्ये नवीन असं काही नाही. कारण गुगल नेहमीच जुन्या होणाऱ्या अँड्रॉईड व्हर्जनमधून सपोर्ट काढत असतं. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गुगल Android 4.4 KitKat वरुन सपोर्ट हटवण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे नेमकं काय नुकसान होईल हे समजून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला अँड्रॉईड व्हर्जन सपोर्टबद्दल माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी गुगल प्ले सर्व्हिस सपोर्ट, अँड्रॉईड व्हर्जन सपोर्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गुगलने जर अँड्रॉईड व्हर्जनचा सपोर्ट बंद केला तरी, त्यानंतर गुगल प्ले सर्व्हिसचा सपोर्ट सुरु ठेवतं. ज्यामुळे फोन नवे फंक्शन आणि नव्या सर्व्हिससह व्यवस्थित काम करतो. याचा प्ले सर्व्हिसचा सपोर्ट बंद झाल्यास अनेक युजर्सला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


10 वर्षं जुनं व्हर्जन


Android 4.4 KitKat ला 2013 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. यासह या लाँचिंगला आता 10 वर्षं पूर्ण होत आहेत. 10 वर्षं जुन्या या व्हर्जनचा फार कमी युजर्स वापर करत आहेत. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, या व्हर्जनवर फक्त 1 टक्के अँड्रॉईड स्मार्टफोन किंवा टॅबलेट काम करतात. यामुळेच आता यावर गुगल प्ले सर्व्हिसचा सपोर्ट रिलीज केला जाणार नाही. 


गुगलचा सपोर्ट बंद झाल्यानंतर या व्हर्जनवर चालणारे फोन युजर्सना गुगल प्ले स्टोअरवरुन संबंधित अपडेट मिळणार नाही. यानंतर 4.4 KitKat युजर्स फक्त Play Services 23.30.99 सोबतच असतील. 


असं करा अपडेट


ज्या युजर्सचा फोन जुन्या किटकॅट व्हर्जनवर सुरु आहे, ते मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन फोन ओएसचं अपडेट तपासू शकतात. जर त्यांच्यासाठी लेटेस्ट अपडेट उपलब्ध असेल तर ते त्यासह आपला फोन अपडेट करुन प्ले सर्व्हिसचा फायदा उचलू शकतात.