Google Most Searched Questions: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा सर्व नागरिकांसाठी चैतन्य घेऊन येते. संपूर्ण देशा दिव्याच्या प्रकाशात व रोषणाईने झगमगत असतो. दिवाळी या दिवसांचे परदेशातही आकर्षण असते. अलीकडेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पोस्ट करत जगभरातील लोक दिवाळीत काय सर्च करत होते. याबाबत एक पोस्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्फाबेट आणि गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण जगभरात दिवाळीबाबत जास्त सर्च करण्यात आलं. संपूर्ण जगात दिवाळीबाबत 5 प्रश्न सगळ्यात जास्त सर्च करण्यात आले आहेत. काय आहे हे प्रश्न हे आपण आता जाणून घेणार आहोत. 


CEO सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे आहे. अन्य भारतीयांच्याबरोबरच त्यांना देखील दिवाळीचे महत्त्व माहिती आहेच. त्यामुळं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी जगभरात सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले प्रश्नही सांगितले आहेत. त्यांनी म्हटलं की, दिवाळीच्या दिवसांत WHY हा टॉप ट्रेंडिग टॉपिक होता. त्यातील पहिला प्रश्न होता तो म्हणजे, भारतीय दिवाळी का साजरी करतात?.


सुंदर पिचाई यांनी एक GIF शेअर केली आहे. यात 5 डॉट असून त्याच्या मदतीने सांगितले आहे की गुगलवर सगळ्यात जास्त कोणते पाच प्रश्न सर्च करण्यात आले होते. तर, त्याव्यतिरिक्त सुंदर पिचाई यांनी एक वेगळी पोस्ट शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


गुगलवर सर्च करण्यात आलेले 5 प्रश्न 


1 भारतीय दिवाळी का साजरी करतात? (Why Indians celebrate Diwali)


2 दिवाळीत रांगोळी का काढली जाते? (Why do we do rangoli on Diwali)


3 दिवाळीत रोषणाई व दिवे का पेटवले जातात? 
(Why do we light lamps on Diwali)


4 दिवाळीत लक्ष्मी पूजन का केले जाते? (Why is Lakshmi puja done on Diwali)


5 दिवाळीत अभ्यंग स्नान का केले जाते? (Why oil bath on Diwali)


गुगल सर्चचा वापर अधिक


संपूर्ण जगभरात इंटरनेटवर कंटेट सर्च करण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जातो. StatCounter Globalच्या रिपोर्टनुसार, संपूर्ण जगभरात ऑक्टोबर महिन्यात गुगलचा मार्केट शेअर 91.55 टक्के इतका होता. त्यानंतर Bing मार्केटचा शेअर असून तो 3.11 टक्के आहे.