तुमच्या कॉम्प्यूटरमधून बंद होईल गुगल क्रोम, करा हा उपाय
तुमच्या कॉम्प्युटरमधून गुगल क्रोम सर्व्हीस लवकरच बंद होणार आहे.
मुंबई : गुगल क्रोम (Google Chrome) नसेल तर आपण कॉम्प्युटरची कल्पनादेखील करु शकत नाही. पण तुमच्या कॉम्प्युटरमधून गुगल क्रोम सर्व्हीस लवकरच बंद होणार आहे. २०२२ मधून कॉम्प्यूटरमधून गुगल क्रोम (Google Chrome) बंद होऊ शकते. विंडो ७ साठी क्रोम पूर्ण बंद असणार आहे.
जानेवारी २०२२ पर्यंत ही सर्व्हीस सुरु राहील. कंपनीने याआधी २०२१ साली आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. NetMarketShare च्या एका रिपोर्टनुसार जगभरात वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटर्सपैकी २०.९३ टक्के वापरकर्ता विंडो ७ वापरतात. गुगलच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यावधी यूजर्सवर होणार आहे.
त्यानंतर विंडो १० ऑपरेटींग सिस्टिममध्येच गुगल क्रोम चालणार आहे.
त्यामुळे ब्राऊजरचा वापर करण्यासाठी तुम्हाला ऑपरेटींग सिस्टीम अपग्रेड करावी लागेल असे गुगलने एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.