मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सर्वर सकाळी 7 वाजेदरम्यान डाऊन झाल्याचे अनेक नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले. नेटकऱ्यांना Error 500  असा मॅसेज मिळत होता. अनेक नेटकऱ्यांना यासंबधीचा स्क्रिनशॉट Twitter वर #googledown या हॅशटॅगसह पोस्ट करीत आहे. खरे तर, Downdetector वर याबाबत फार रिपोर्ट आलेले नाहीत. नेटकऱ्यांना गुगल सर्च आणि साईट ओपन करण्यास अडचणी येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नेटकऱ्यांना येतोय हा मॅसेज
अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter वर गुगल डाऊन असल्याचे म्हटले आहे. नेटकरी #googledown या हॅशटॅगसह Error 500 असा मॅसेज असलेला स्क्रिनशॉट शेअर करीत आहेत.


गुगलची ही अडचण अनेक देशांमधील नेटकऱ्यांना जाणवली. परंतू 5-7 मिनिटांच्या आउटेजनंतर गुगलचे सर्वर पुन्हा सुरळीत काम करीत आहे. गुगलकडून या आउटेजबाबत अद्यापतरी सविस्तर माहिती शेअर करण्यात आलेली नाही. भारतातीलच नव्हे तर अनेक देशांमधील नेटकऱ्यांना ही समस्या जाणवली.