मुंबई : सर्च इंजिन कंपनी गूगलने (Google) अलीकडेच एक नवीन ऍप लॉंच केलं आहे. ज्यामुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही आपण आपली कामं पूर्ण करू शकतो. म्हणजेच, फोनमध्ये नेटवर्क नसलं तरीही, व्हायफाय संबंधित सर्व कामे या ऍपच्या मदतीने केली जातील. गूगलचा असा दावा आहे की, Wifi Awareचा वापर महत्त्वाच्या कामांसाठी होवू शकतो. यामुळे इंटरनेट कनेक्शनशिवाय आपण कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये आणि सिनेमागृहात तिकिट बुक करू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगलने संबंधित ऍप प्ले स्टोअरवर  'WifiNanScan' नावाने लॉंच केला आहे. हा ऍप डेवलपर्स, विक्रेते आणि विद्यापीठांच्या संशोधनासाठी, डेमोंस्ट्रेशन आणि चाचणी साधन म्हणून तयार करण्यात आला आहे. याशिवाय दोन स्मार्टफोनमधील अचूक अंतर देखील या अ‍ॅपद्वारे मोजले जाऊ शकते. 



हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही फोन 1 ते 15 मीटरच्या अंतराच्या आत असतील. एवढेच नव्हेतर इंटरनेट कनेक्शनशिवाय आपण या ऍपच्या मदतीने कागदपत्रे प्रिंटरवरही पाठवू शकतो. Android 8.0 आणि os VERSION ओएस व्हर्जनच्या सर्व डिव्हाइसवर या ऍपचा वापर होवू शकतो. गूगलने केलेल्या दाव्यानुसार हा ऍप पूर्णपणे सुरक्षित आहे. या ऍपच्या मदतीने यूजर्स ब्ल्यूटूथ आणि व्हायफाय कनेक्शनशिवाय मेसेज आणि डेटा शेअर करू शकतात.