Google Map Feature: गुगल मॅपमध्ये अनेक फिचर अॅड करण्यात येत आहेत. ज्याचा थेट परिणाम कार ड्रायव्हिंगवर होणार आहे. तसं बघायला गेलं तर गुगल मॅपचे असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड फिचर बंद करण्यात येईल, अशी घोषणा गुगलकडून 2020 सालीच करण्यात आली होती. मात्र, तब्बल 4 वर्षांनंतर असिस्टेंट ड्रायव्हिंग फिचर बंद करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये गुगल मॅप असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड बंद करण्यात येणार आहे. त्यामुळं आता तुम्ही कार ड्राइव्ह करणार असाल तर मॅपमध्ये असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड दिसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल मॅपच्या असिस्टेंट ड्रायव्हिंग मोड एक डॅशबोर्ड उपलब्ध आहे. ज्यामध्ये मीडिया सजेशन, ऑडिओ कंट्रोल आणि मॅप यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील. मात्र, हे फिचर बंद होत असल्याने असिस्टेड ड्रायव्‍हिंग मोड Android Auto ने बदलता येईल. Android Auto हेदेखील गुगलचेच एक प्रोडक्ट आहे. कार ड्राइव्हसाठीच हे डिझाइन केले गेले आहे. अँड्रोइड मोबाइलला कारच्या एंटरटेनमेंट बोर्डला कनेक्ट करण्याची सुविधा देते. 


एका रिपोर्टनुसार, गुगल मॅपला लवकरच एक नवीन इंटरफेस मिळणार आहे. गुगल मॅप असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड फिचरमध्ये मीडिया क्लिप्स, मॅप्सची माहिती आणि स्ट्रिमिंग अॅपची माहिती मिळत होती. मात्र, आता हे फिचर अॅपल प्लेप्रमाणे काम करेल, ज्यामुळं कार चालवणाऱ्या अँड्रोइड युजर्सना खूप सुविधा मिळणार आहेत. तसंच, गुगल मॅपला नवीन इंटरफेसदेखील मिळणार आहे. 


गुगल मॅपचे नवे फिचर 


आत्तापर्यंत गुगल मॅपचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जात होता. मात्र, आता त्यात नवीन फिचर अॅड करण्यात आले आहेत. वेळेनुसार गुगलने अनेक फिचर्स अॅपमध्ये अॅड केले आहेत. या लिस्टमध्ये आता फ्यूल सेव्हिंग फिचरदेखील अॅड करण्यात आले आहे. अमेरिकेत पूर्वीपासूनच हे फिचर उपलब्ध आहे. सप्टेंबर 2022मध्ये हे फिचर लाँच केले होते. कॅनडा, अमेरिका आणि युरोपनंतर आता अखेर भारतात हे फिचर अॅड करण्यात आले आहे. 


हे फिचर फ्यूल एनर्जीचा अंदाज सांगते. म्हणजेच एका मार्गावर तुमचे किती पेट्रोल खर्च होईल, याची शक्यता सांगते. गुगल मॅप याचा अंदाज त्या मार्गावर असलेल्या  ट्रॅफिक आणि रस्त्याची अवस्था याआधारे सांगते. त्यानंतर गुगल मॅपकडून दुसराही मार्ग सांगण्यात येतो. त्या मार्गावर किती ट्रॅफिक असेल आणि किती पेट्रोल लागेल याचाही अंदाज सांगितला जातो. आता युजर्सनी कोणता मार्ग वापरावा हे त्यावर अवलंबून आहे.