Google Map: सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळं जग जवळ आलं आहे असं म्हणतात. मात्र, जसे त्याचे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. ऑनलाइन पेमेंटमुळं आता अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अडीअडचणीच्या काळात ऑनलाइन पेमेंटचा खूप फायदा होतो. मात्र, त्याचबरोबर एक धोकादेखील निर्माण झाला आहे. सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढत आहे. सायबर चोर वेगवेगळ्या कल्पना लढवत नागरिकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. अशातच तुम्ही जर गुगल मॅपचा वापर करत अशाल तर सावधान. अन्यथा तुम्हालाही मोठी जोखीम पत्करावी लागेल. 


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर Shmuli Evers नावाच्या युजर्सने एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, त्यांने आधीच बुकिंग केलेली डेल्टा एअरलाइन्सची तिकिट रद्द झाली. त्यानंतर त्याने कस्टमर केअरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडून काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर त्याने गुगल मॅपच्या माध्यमातून एअरलाइनचा हॉटलाइन नंबर सर्च करुन कंपनीसोबत संपर्क साधला. मात्र तो नंबर चुकीचा होता. एअरलाइनच्या ऑफिशिअल नंबरला बदलवून तिथे तो नंबर रिप्लेस करण्यात आला होता. 


गुगल मॅपवर बनावट नंबर 


सायबर चोरांनी गुगल मॅपवर बनावट नंबर टाकला होता. Shmuli Evers ने त्याच्या फ्लाइटचे नाव आणि नंबरची संपूर्ण माहिती त्यांना दिली.  तेव्हा त्यांनी त्याला दुसऱ्या नंबरवरुन Confermation message पाठवायला सांगितला. त्याचबरोबर त्याने नवीन फ्लाइटच्या रिझर्वेशनबाबतही बोलणे केले. त्यामुळं त्याला थोडा संशय आला. त्यामुळं त्याने फोन कट केला. 


यानंतर सायबर चोरांकडून त्याला खूप सारे मेसेज करण्यात आले. त्याचबरोबर पाचपट पेमेंट करण्यात येईल, असंही सांगण्यात आले. मात्र, Shmuli Evers वेळीच सावध झाल्यानंतर त्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले. ट्विटरवर त्याने हा प्रसंग शेअर केला आहे. त्यांच्या ट्विटनंतर गुगल मॅपवरुन बनावट नंबर हटवण्यात आला आहे आणि ऑफिशियल नंबर पुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


या चुका अजिबात करु नका 


गुगल किंवा गुगल मॅपवरुन नंबर घेताना व्हेरिफाय करुन घ्या. तसंच, तिथून घेतलेल्या कोणत्याही नंबरवरुन पेमेंट करणे टाळा. तसंच, तुमची माहिती आणि बँकेची माहिती देऊ नका. तसंच, ओटीपीदेखील शेअर करण्याची चुक करु नका.