Google Map Fuel Saving Feature: मोबाइल फोन आणि इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहेत. जसजशी मोबाइलची गरज वाढली आहे त्यासोबतच त्यातील काही फिचरही रोजच्या आयुष्यात सर्रास वापरले जातात. त्यातीलच एक म्हणजे गुगल मॅप. रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा खूपच फायदा होतो. आत्तापर्यंत गुगल मॅपचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जात होता. मात्र, आता त्यात नवीन फिचर अॅड करण्यात आले आहेत. वेळेनुसार गुगलने अनेक फिचर्स अॅपमध्ये अॅड केले आहेत. या लिस्टमध्ये आता फ्यूल सेव्हिंग फिचरदेखील अॅड करण्यात आले आहे. अमेरिकेत पूर्वीपासूनच हे फिचर उपलब्ध आहे. सप्टेंबर 2022मध्ये हे फिचर लाँच केले होते. कॅनडा, अमेरिका आणि युरोपनंतर आता अखेर भारतात हे फिचर अॅड करण्यात आले आहे. 


फिचर कसं काम करतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फिचर फ्यूल एनर्जीचा अंदाज सांगते. म्हणजेच एका मार्गावर तुमचे किती पेट्रोल खर्च होईल, याची शक्यता सांगते. गुगल मॅप याचा अंदाज त्या मार्गावर असलेल्या  ट्रॅफिक आणि रस्त्याची अवस्था याआधारे सांगते. त्यानंतर गुगल मॅपकडून दुसराही मार्ग सांगण्यात येतो. त्या मार्गावर किती ट्रॅफिक असेल आणि किती पेट्रोल लागेल याचाही अंदाज सांगितला जातो. आता युजर्सनी कोणता मार्ग वापरावा हे त्यावर अवलंबून आहे. 


गुगल मॅपचे हे फिचर बंद केल्यानंतर मॅप एकच मार्ग दाखवेल मग तुम्हाला तोच मार्ग फॉलो करायचा आहे. मात्र, त्यानंतर किती पेट्रोल आणि एनर्जी याबाबत माहिती दिली जाणार नाही. पेट्रोल आणि एनर्जीचा अंदाज गाडीच्या इंजिनवर डिपेंड करतो. आता ग्रीन लीफसह हे फिचर देण्यात आले आहे. हे फिचर सुरू करण्यासाठी तुम्ही काही स्टेप वापरुन सुरू करु शकता. त्यानंतर तुमचे 2 हजारांपर्यंतचे पेट्रोल किंवा डिझेल वाचू शकते. 


- फिचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो


- स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप सुरू करा


- प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करुन सेटिंग्समध्ये जा व नेव्हिगेशनवर टॅप करा


- रूट ऑप्शन स्क्रॉल करा


- इको-फ्रेंडली रुट टर्न ऑन करुन फ्लुएल एफिशिएंट रुट्सवर क्लिक करा


- तिथे तुम्हाला इंजिन टाइप असा पर्यायही दिसेल. ज्यावर क्लिक करुन तुम्ही तुम्हाला हवे असलेले बदल करु शकता.