मुंबई : गुगलने अलीकडेच आपल्या यूजर्ससाठी अनेक मोठे फक्शन्स लॉन्च केली आहेत. आता गुगल 'माझे डिव्हाइस शोधा' इकोसिस्टममध्ये एक नवीन फक्शन जोडण्याचा विचार करत आहे. गुगलचे हे उपकरण प्रत्येक स्मार्टफोन आणि कार वापरणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगल इतर Android उपकरणांच्या मदतीने हरवलेले स्मार्टफोन शोधण्यासाठी एका फक्शनवर काम करत आहे. तसेच, कारसाठी अँड्रॉइड ऑटो इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto Infotainment System) आणण्याची योजना आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कारचा शोध घेऊ शकणार आहे.


इंटरनेटशिवाय फोन शोधता येणार
गुगल त्याच्या फाईन्ड माय डिव्हाइसवर एक फक्शन सुरु करण्याचा विचार करत आहे. यासह, यूजर्स त्यांच्या डिव्हाईसची मालकी इतर कोणाशीही शेअर करू शकतात. हे फक्शन आल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन शोधण्यात मोठी मदत मिळेल, ती सुद्धा कोणत्याही इंटरनेटशिवाय.


गुगलअँड्रॉइड ऑटो इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये (Android Auto Infotainment System) लॉग इन करण्याची क्षमता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून वापरकर्ते गुगल खात्याद्वारे कनेक्ट होऊ शकतील. यामुळे ट्रॅक करणे सोपे होईल. या व्यतिरिक्त, हे वैशिष्ट्य आपल्या Google खात्याच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेईल, आपण कोणत्याही प्रकारचे अनधिकृत प्रवेश टाळण्यास सक्षम असाल.


Apple डिव्हाइसेस शोधण्यात मदत करणार 
 गुगल Appleच्या 'फाइंड माय' च्या अशा वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे नेटवर्कसारखे काम करते. हे वैशिष्ट्य Apple डिव्हाईस वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी देखील फायदेशीर आहे. फाइंड माय अॅप वापरून, तुम्ही Apple आयडीने लॉग इन केलेले Apple डिव्हाइस शोधू शकता आणि नंतर तुम्ही एअरटॅग देखील ट्रॅक करू शकता.