मुंबई : तुम्ही 'गूगल अॅप्स' वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही सुरक्षा तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'गूगल प्ले स्टोअर'मध्ये 'अॅपल अॅप स्टोअर'च्या तुलनेत अधिक मालवेअर आणि कमतरता आहेत... याच चुका सुधारण्यासाठी गूगलनं एक नवीन पाऊल उचललंय.


'गुगल प्ले स्टोअर' आणि 'अॅन्ड्रॉईड अॅप'मधल्या चुका शोधून काढणाऱ्याला कमीत कमी १००० यूएस डॉलर म्हणजेच जवळपास ६५ हजार रुपयांचं बक्षीसच गूगलनं जाहीर केलंय.  


गूगलची पॅरेंट कंपनी 'अल्फाबेट' गूगल प्ले स्टोअरमधून सगळे 'बग्ज' हटवण्याच्या मोहिमेवर आहे. यासाठी गूगलनं 'हॅकरवन' नावाच्या कंपनीशी हातमिळवणीही केलीय. ही कंपनी अॅन्ड्रॉईड अॅपमधल्या सगळ्या कमतरता शोधून काढणार आहे. या मालवेअर आणि कमतरतांमुळे हॅकर्सला कोणत्याही युझरला 'फिशिंग वेबसाईट'कडे धाडणं सोपं जातं... यामुळे वायरसचा धोका वाढतो. 


उल्लेखनीय म्हणजे, 'गूगल प्ले सिक्युरिटी रिवॉर्ड प्रोग्राम' दुसऱ्या कंपन्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये रिसर्चला स्पॉन्सर करतो. मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि अल्फाबेट या कंपन्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कमतरता शोधून काढणाऱ्याला अनेकदा बक्षीसं देताना दिसतात. आत्तापर्यंत गूगलनं जवळपास १५ लाख डॉलर्सची बक्षीसं दिलीत.