नवी दिल्ली : इंटरनेट ही काळाची गरज झाली. गुगलवर आपल्याला हवी ती माहीती मिळते. अनेकजण दिवसभर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टीव्ह असतात. या प्रत्येकाचा वेगवेगळा पासवर्ड असतो. पण आपल्यापैकी किती जण हा पासवर्ड नियमित बदलतात ? उत्तर नाही असेल. पण असे न करणे तुम्हाला महागात पडू शकते आणि तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. तुमचे महत्त्वाचे दस्तावेज, चॅट्स या पासवर्डच्या पलीकडे असतात. अशावेळी पासवर्ड हॅक होणे म्हणजे पश्चाताप केल्यासारखे होऊ शकते. पण गूगलच्या मदतीनेच तुम्ही यातून वाचू देखील शकता. गूगलच्या क्रोम ब्राऊजरवर असलेल्या एका फिचरचा वापर करुन तुम्ही पासवर्ड हॅकर्स पासून सुरक्षित राहू शकता. गूगल पासवर्ड चेक असे या फिचरचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगल क्रोमकडे पहिल्यापासूनच पासवर्ड मॅनेजमेंट सपोर्ट सिस्टिम आहे. याचा अर्थ तुम्ही क्रोमचा वापर करुन पासवर्ड आणि युजरनेम जनरेट, स्टोर आणि अपडेट करु शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि पासवर्ड बॉक्सवर क्लिक करावे लागेल. गूगल पासवर्ड चेकअप फिचर सेकंड लेयर म्हणून काम करतो आणि तुम्हाला पासवर्ड बदलायला हवा किंवा नको हे सांगतो. 
 
कोणता पासवर्ड सुरक्षित आहे आणि कोणता नाही हे शोधून काढण्यासाठी गूगल एन्क्रिप्टेड डेटाबेसचा वापर करता येतो. या प्रक्रिये दरम्यान कोणताही डेटा लीक होत नाही. जर गूगलला तुमच्या पासवर्डमध्ये काही मॅच सापडले तर तो लगेच तुम्हाला पासवर्ड बदलाचा सल्ला देतो. 


जेव्हा तुम्ही कोणत्या साईटवर लॉग इन करता आणि तुमचा युजरनेम आणि पासवर्ड देखील त्या 400 कोटी पासवर्ड किंवा युजरनेममध्ये जाते, जे असुरक्षित असते. त्यानंतरही गूगल तुम्हाला पासवर्ड बदलण्याचा सल्ला देतो. 


पण असं जरी असलं तरी तुम्हाला तुमच्या सवयीही बदलाव्या लागतील. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहणे हेच तुमच्यासाठी सुरक्षित असू शकते. तसेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ला इनॅबल करावे लागेल. गूगल पासवर्ड चेकअप टूल इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला क्रोमच्या एक्सटेंशन पेज वर जावे लागेल.