Google Pay New Feature: गुगल फिचरचे एक नवीन फिचर आलं असून या मुळं पेमेंट करणे आणखी सोप्पं होणार आहे. कारण युजर्सना एकाचवेळी तीन फिचर्स मिळणार आहेत. यातील सर्वात बेस्ट फिचर असणार आहेत ते 'Buy Now Pay Later' म्हणजेच युजर्सच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतानाही तुम्हाला दुकानदाराला पैसे देता येणार आहे. या फिचर्सची सध्या जोरदार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा असं होतं की तुम्ही पेमेंट करण्यासाठी जातात पण तेव्हा लक्षात येतं की खात्यात पैसेच नाहीयेत. अशावेळी दुकानदारासमोर आपली चांगलीच फजिती होते. तसंच, आवश्यक असलेले वस्तुदेखील घेता येत नाही. अशावेळी युजर्ससाठी हे फिचर्स खूप फायद्याचे ठरणार आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही पेमेंट करणार तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे जाणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला  Installment चा पर्याय वापरु शकणार आहेत. म्हणजे तुम्ही हफ्तांमध्ये हळुहलु पेमेंट करु शकणार आहात. म्हणजेच हे फिचर एकप्रकारे तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड म्हणून वापरता येणार आहे. अनेकांसाठी हे फिचर चांगला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. 


त्याचबरोबर गुगल पेकडून अन्य फिचर अॅड केले आहेत. यात Chrome आणि Android वर Autofill इनेबल करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिनचा वापर करुन तपशील ऑटो फिल करु शकणार आहात. यानंतर तुम्हाला पेमेंट करणे सोप्पे जाणार आहे. एकदा का हे फिचर इनेबल केले तर तुम्हाला जास्त सिक्युरीटी असलेले प्रश्न विचारले जाणार आहेत. 


Google Wallet


Google कडून काही दिवसांपूर्वीच Wallet अॅप लाँच करण्यात आले होते. हे एक डिजीटल वॉलेट आहे ज्याचा लोक खूप जास्त वापर करतात. यात तुम्ही सर्व कार्डचे तपशील अॅड करु शकता. एकदा असं केल्याने नंतर तुम्हाला अधिक टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही हे पेमेंट अॅपसोबतही कनेक्ट करु शकणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करणे खूप सोपं जाणार आहे.