Apple App स्टोअरमधून Google Pay अचानक गायब, हे आहे महत्त्वाचं कारण
गूगल (Google) ऑनलाईन पेमेंट अॅप गूगल पे (Google Pay)ला अॅपल स्टोअरमधून (Apple Store)काढून टाकण्यात आलं आहे.
मुंबई : गूगल (Google) ऑनलाईन पेमेंट अॅप गूगल पे (Google Pay)ला अॅपल स्टोअरमधून (Apple Store)काढून टाकण्यात आलं आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, Google Payला अॅप स्टोअरकडून अॅपमधील काही प्रॉब्लेम सोडवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच अँड्रॉयड सोबत असं नाही. गूगल प्ले स्टोरमध्ये Google Payअॅप उपलब्ध आहे.
खरंतर अॅपमध्ये काही अडचणी येत असल्यास कंपन्यां अशा अॅपना स्टोअरमधून काढून टाकतात. कारण एखाद्या अॅपमध्ये अडचणी येत असल्यास, ग्राहकांचं नुकसान होवू शकतं, त्यांच्या अडचणीत भर पडते.
ट्रान्झॅक्शन करताना अडचणी
सध्या अॅपल अॅप स्टोअरमध्ये गुगल पे अॅप दिसत नाहीय. पण आयफोनमध्ये याआधीच गूगल पे इन्स्टॉल असेल तर, ते अॅप अजुनही काम करतंय. पण युझर्सने तक्रार केलेली आहे की, युझर्सना ट्रान्झॅक्शन करण्यात अडचणी येत आहेत.
कधी परतणार Apple Store वर गुगल पे?
आपल्या स्टेटमेंटमध्ये गुगल पे ने म्हटलं आहे iOS यूजर्सला Google Pay अॅपमध्ये येणाऱ्या ट्रांजेक्शनमध्ये फेलियरची अडचण येत होती, ती दूर करण्यात आली आहे. तसेच आमची टीम ही अडचण ठिक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जेव्हा ही अडचण पूर्णपणे सोडवली जाईल. तेव्हा अॅपल प्ले स्टोअरवर गुगल पे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी देखील अॅपल स्टोअरमध्ये अडचणी निर्माण करणारे अॅप हटवले गेलेले आहेत.