मुंबई: आपल्या फोनमध्ये काहीवेळा प्रायव्हेट फोटो असतात. जे कुणीही पाहू नये असं वाटतं. कधी-कधी काही महत्त्वाचे डॉक्युमेंटचे फोटोही असतात जे कोणाला दिसू नयेत यासाठी आपण ते लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आता गुगलने एक खास फीचर आणलं आहे. या फीचरमुळे आता युझर्सला मोठा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोनमधील फोटो आणि व्हिडीओजच्या स्टोरेजसाठी Google Photos अॅपचा खूप वापर केला जातो.  नुकतेच Google Photos ने एक खास फीचर आणलं आहे जे युझर्सना त्यांचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करण्यासाठी खास फीचर आणलं आहे. 


Google Photos च्या नवीन फीचरचा उपयोग करून तुम्ही तुमचे खासगी फोटो आणि व्हिडीओ पासवर्ड सह लॉक करू शकता. अॅपच्या या नवीन फीचरचे नाव 'लॉक फोल्डर' आहे. जे तुमच्या प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओसाठी स्वतंत्र फोल्डर तयार करेल. तुम्ही तुमच्या फोनचा पासवर्ड, फिंगरप्रिंट, पॅटर्न किंवा लॉक या फोल्डरसाठी पासवर्ड ठेवू शकता. 


या फोल्डरला तुम्ही तुमचा वेगळा पासवर्ड अथवा तुमचा फोनचा पासवर्डही सेट करू शकता. तुम्हाला जे फोटो प्रायवेट ठेवायचे आहेत ते व्हिडीओ आणि फोटो तुम्ही या फोल्डरमध्ये शिफ्ट करू शकता. उजव्या बाजूला more असा पर्याय असेल. त्या ऑपशनवर क्लीक करू शकता. तिथे Move to Unlock Folder हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ या प्रायव्हेट फोल्डरमध्ये शिफ्ट होऊ शकतील. 


तुम्ही तुमच्या लॉक केलेल्या फोल्डरमध्ये ठेवलेले फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील, तर त्यासाठी काय करायचं असा प्रश्न पडला असेल. तर ते फोटो तुम्ही कसे शोधायचे हे देखील आम्ही सांगणार आहोत. पहिल्यांदा तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Photos अॅप उघडावे लागेल. यामध्ये तुम्हाला 'युटिलिटीज' हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला लॉक फोल्डरचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला तुमचे फोटो आणि व्हिडीओ दिसतील.