Google : कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च (Google Search) करतो. गुगलकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. मोबाइल, (mobile search) कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण जर गुगलवर असंख्य गोष्टी गुगलवर सर्च करतो. परंतु, Google वर सर्च करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गुगलवर सर्च करताना केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. चला तर मग आज जाणून घेऊ या की त्या कोणत्या गोष्टी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शस्त्रास्त्रांची माहिती


जर तुम्ही गुगलवर शस्त्रास्त्रांबद्दल (Weapons) सर्च करत असाल तर आताच थांबा. खरं तर अशा सर्चवर सुरक्षा एजन्सी लक्ष ठेवतात आणि जर तुम्ही असा सर्च पुन्हा पुन्हा करत राहिलात तर तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. 


लष्करी संवेदनशील माहिती


जर तुम्हाला लष्कराशी (Army) संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती मिळवायची असेल,  आणि त्यासाठी तुम्ही गुगलवर वारंवार सर्च करतात. तर तुम्ही असे करू नका. कारण लष्कराशी संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती मिळवायचा नादात तुमच्यावर कारवाई होऊ शकते. 


बाल गुन्हेगारी


चुकूनही चाईल्स पॉर्नोग्राफी (Chiles Pornography) गुगलवर सर्च करू नका. भारतात चाईल्स पॉर्नोग्राफीसाठी कठोर कायदे आहेत. भारतात पॉक्सो ॲक्ट 2012 च्या कलम 14 अंतर्गत चाईल्ड पॉर्न पाहणं, तयार करणं आणि आपल्याकडे बाळगणं गुन्ह्यांतर्गत येतं. यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवा खावा लागू शकते. 


गुगलवर तुमचा ईमेल आयडी शोधू नका


गुगलवर तुमचे ईमेल (email login) लॉगिन कधीही शोधू नका. असे केल्याने तुमचे खाते हॅक होऊ शकते आणि पासवर्ड लीक होऊ शकतो.


वाचा: Meta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा 


गर्भपाताबद्दल शोध घेणे


गर्भपाताशी संबंधित माहिती गुगलवर सर्च (Google Search) केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. भारतात सरकारने यासाठी कडक कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे. डॉक्टरांच्या मान्यतेनंतरच हे शक्य आहे, म्हणून पुढच्या वेळी असे काहीही शोधण्यापूर्वी विचार करा. 


बॉम्ब कसा बनवायचा


बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर चुकूनही सर्च करू नका. बॉम्ब किंवा त्याच्याशी संबंधित काहीही सर्च केल्यास तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. तुम्ही गुगलवर अशी एखादी गोष्ट सर्च करताच, तुमचा आयपी अॅड्रेस थेट सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचेल. यानंतर सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकतात.