मुंबई : जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड', 'चायना मेड टॉलेट पेपर' किंवा 'टॉयलेट पेपर' सर्च केलं तर पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. गुगलवर झालेल्या या गोंधळाचे स्क्रीनशॉट्स ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. एवढच नाही तर या फोटोंचे मीम्सही व्हायरल होत आहेत. गुगलशी याबाबत संपर्क केला असला, तरी त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही गुगलवर काही शब्द सर्च केले तर काही वादग्रस्त रिझल्ट यायचे. याआधी 'इडियट' सर्च केलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो यायचे. याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर गुगलनं काही बदलाव केले होते. गुगलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह सर्च आले आहेत.


युट्यूब चुकीच्या व्हिडिओची शिफारस करणार नाही


गुगलची मालकी असणारं युट्यूब आता चुकीच्या व्हिडिओची शिफारस करणार नाही. सामुदायिक दिशानिर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंची शिफारस युट्यूब करणार नाही. जमीन चपटी होणं किंवा ९/११ सारख्या ऐतिहासिक घटनांबद्दल चुकीच्या गोष्टी असलेले व्हिडिओ युट्यूबवर दिसणार नाहीत.


युट्यूबनं २५ जानेवारीला लिहिलेल्या त्यांच्या ब्लॉग पोस्टनुसार यूजरनं व्हिडिओ बघितल्यानंतरच साईट या व्हिडिओची शिफारस करते. आता यूजरला या व्हिडिओशी मिळते-जुळते व्हिडिओ दाखवण्यात येणार नाही. तर वेगळ्या व्हिडिओचीही शिफारस केली जाईल.


युट्यूबच्या दिशानिर्देशांनुसार जे व्हिडिओ नियमांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ब्लॉक केले जाऊ शकत नाहीत, पण सीमारेषेवर आहेत, अशा व्हिडिओंवर लगाम लावण्यात येईल. युट्यूबच्या या निर्णयामुळे व्हिडिओ उपलब्ध होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. चुकीचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केलं असेल, तर मात्र यूजरला असे व्हिडिओ दिसतील.