मुंबई : स्मार्टफोनच्या 'स्मार्ट' जगात अण्ड्रॉईड वापरत नाही, असा व्यक्ती मिळणे कठीणच. त्यामुळे आसपासची बहुतांश मंडळी अण्ड्रॉईडच्या वेडाने झपाटली असतानाच एक धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे अण्ड्रॉईड फोन वापरताना सावधान...


गुगलने मान्य केला आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यावर होणाऱ्या आरोपाबाबत इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने नुकतीच एक पुष्टी केली. या पुष्टीत गुगलने म्हटले आहे की, अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन सातत्याने यूजर्स लोकेशन ट्रॅक करत असतो. भलेही यूजर्सने आपल्या स्मार्टफोनमधील लोकेशन आणि जीपीएस हे ऑप्शन ऑफ करून ठेवले असतील. गुगलवरून अण्ड्रॉईड यूजर्सचे लोकेशन ट्रॅक करतो, असा आरोप गुगलवर करण्यात आला होता. या आरोपाची पुष्टी केल्यावर गुगलने आरोप मान्य केला. तसेच, स्पष्टीकरन देताना लवकरच आपण ही कमी भरून काढू असा विश्वासही यूजर्सला दिला.


तुम्ही कितीही करा लोकेशन ऑफ गुगल करतो ट्रॅक


गुगलने म्हटले की, जानेवारी 2017मध्ये मोबाईलच्या विक्री क्रमांकाचा उत्कृष्ट सिंग्नल मिळण्यासाठी वापर करणे सुरू करण्यात आले होते. मात्र, यात कोणाच्या पूर्वपरवानगीशिवाय लोकेशन पाहने अपेक्षीत नव्हते. दरम्यान, काही अभ्यासकांचे निरिक्षण असे की, कदाचित गुगलचा डेटा इनक्रिप्टेड असेल. बाहेरच्या कंपन्या गुगलच्या माध्यमातून यूजर्सचे लोकेशन तपासतात. महत्त्वाचे असे की, या समस्येवर सध्यातरी कोणताच मार्ग नाही. अगदी आपण आपला फोन फॉर्मेट केला. लोकेशन ऑफ केला तरीसुद्धा आपले लोकेशन ट्रॅक होत राहील, असेही अभ्यासकांनी म्हटले आहे.