मुंबई : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल पेमेंटला प्राधान्य देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध स्वरुपात पण डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अ‍ॅप्स सुरू करण्यात आले. पण आता यामध्ये गुगलदेखील उडी घेणार आहे. 


गूगलच्या या पेमेंट अ‍ॅपचे नाव 'तेज' आहे. या नव्या अ‍ॅप्लिकेशनबाबत कंपनी येत्या १८ सप्टेंबरला अधिकृत घोषणा करणार आहे. गूगलतर्फे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सध्या अमेरिकेत सुरू आहे. पण लवकरच ती भारतीय ग्राहकांनादेखील खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांमध्येही याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 


सुमारे वर्षभरापूर्वी मोदी सरकारने काळा पैसाविरोधात  पाऊलं उचलताना नोटाबंदीचा निर्णय घेतला. ५०० आणि  १०००च्या नोटा बंद केल्या. त्यानंतर नागरिकांनी अधिकाधिक डिजिटल पेमेंटचा वापर करावा यासाठी प्रोत्साहन दिले. अशावेळेस पेटीएम, फ्रीचार्ज, मोबीक्वीक यासह विविध नामांकित बँकांनीही ऑनलाईन पेमेंटच्या अनेक सुविधा उपालब्ध करून दिल्या. आता गूगलतर्फे देण्यात येणारी नवी सुविधा यापेक्षा किती हटके असेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.