नवी दिल्ली : मोबाईलचं ब्लूटूथ आणि वाय फाय बंद करायला तुम्ही विसरता का ? हो, तर मग तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ब्लूटूथ आणि वाय फाय सतत ऑन ठेवल्याने तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते. इतकंच नाही तर मोबाईलमध्ये असलेली  तुमची खाजगी माहिती देखील सार्वजनिक होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिसर्च फर्म अर्मिसच्या नुसार, ब्लू टूथ, वायफाय यांसारख्या डिजिटल एन्ट्रन्स सतत चालू ठेवणे धोक्याचे आहे. यामुळे Blueborne मलवेयर मोबाईलमध्ये घुसू शकतो. यामुळे मोबाईलचे अत्यंत नुकसान होते. 


Blueborne मलवेयर मोबाईलमध्ये घुसण्यासाठी कोणत्याही यूआरएल, इंटरनेट कनेक्शन किंवा कोणताही अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. ब्लू टूथ, वायफाय चालू असल्यास ते थेट मोबाईलमध्ये प्रवेश करतात. यामुळे हॅकर्स थेट तुमच्या मोबाईलशी कनेक्ट होऊन तुमचा मोबाईल डेटा एक्सेस करू शकतात. त्याचबरोबर मलवेयर अधिक प्रमाणात पसरवू शकतात. 


अर्मिसने दिलेल्या माहितीनुसार, जर मोबाईलमध्ये Blueborne ने प्रवेश केल्यास ज्या डिव्हाईसला तुम्ही फोन कनेक्ट कराल त्या डिव्हाईसमध्ये देखील Blueborne पसरत जाईल. स्मार्टफोन, सिस्टम,टॅबलेट, ब्लूटूथ हेडफोन या सगळ्या डिव्हाईसवर त्याचा इफेक्ट होईल.  


मलवेयरमुळे हॅकर्स तुमच्या बँक खात्यापासून इतर अनेक खाजगी गोष्टींपर्यंत सहज पोहचू शकतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. या मलवेयरमुळे सुमारे ५.३ बिलियन डिव्हाईस प्रभावित आहेत.