मुंबई:  देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्याचे निमित्ताने यंदा भारत स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा करत आहे. याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हर घर तिरंगाची घोषणा केली आहे. या निमित्ताने देशभरातील नागरिक आपल्या घरावर तिरंगा फडकवू शकतात. विशेष म्हणजे नागरिकांना अवघ्या २५ रुपयात तिरंगा खरेदी करता येईल. पोस्ट ऑफिसद्वारे नागरिकांना घरपोच तिरंगा पोहचवला जाईल व यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. तुम्हाला घरपोच तिरंगा कसा मिळेल, याविषयी जाणून घ्या. (Har Ghar Tiranga Campaign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरी झेंडा फडकवण्यासाठी तुम्हाला ध्वजसंहितेचे पालन करावे लागेल. तसेच, नागरिकांना घरपोच झेंडा मिळावा यासाठी सरकारने पोस्ट ऑफिसला सुचना केल्या आहेत. नागरिकांना अवघ्या २५ रुपयात घरपोच तिरंगा मिळणार आहे. 



घरी तिरंगा मागवण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा 


- सुरुवातील ई-पोस्ट ऑफिस पोर्टलवर जावे लागेल. येथे नवीन यूजर म्हणून रजिस्टर करा.
- त्यानंतर साइटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला राष्ट्रध्वज दिसेल. त्या पेजवर क्लिक करा.
- पुढे शॉपिंग कार्टमध्ये झेंड्यांचा समावेश करून शिपिंगची माहिती द्या. या प्रोसेसनंतर तुम्हाला घरपोच झेंडा मिळेल.
- यासाठी तुम्हाला 25 रुपये देखील द्यावे लागतील. 
- झेंड्याचा आकार 20x30 इंच असेल. 
- एकदा ऑर्डर केल्यावर तुम्ही नंतर रद्द करू शकत नाही.