मुंबई : देशातली सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पनं मंगळवारी एक्सट्रीम २०० आर ही नवी बाईक लॉन्च केली आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हिरोनं ही नवी बाईक आणली आहे. याआधी हिरोनं या बाईकचं कॉन्सेप्ट व्हर्जन ऑटो एक्सपो २०१६मध्ये दाखवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन हिरो एक्सट्रीम २०० आर प्रिमियम बाईक सेगमेंटची एन्ट्री लेव्हल बाईक आहे. एक्सट्रीम २०० आरमध्ये २०० सीसीचं सिंगल सिलेंडर एयरकूल्ड इंजिन आहे. ५ स्पीड गिअर बॉक्स असणाऱ्या या बाईकचं इंजिन १८.४ पीएस पॉवर आणि १७.१ न्यूटर मीटरची टॉर्क जनरेट करतं. बाईकमध्ये ५ स्पी़ड यूनिटचा गियर बॉक्स आहे.


ही बाईक फक्त ४.६ सेकंदांमध्ये शून्य ते ६० किमी प्रती तासाचा स्पीड पकडेल, असा दावा कंपनीनं केला आहे. एक्सट्रीम २०० आर ३९.२९ किमी प्रति लिटर मायलेज देते. बाईकच्या मागच्या आणि पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आहे.


एक्सट्रीम २०० आरचा लूक मॉर्डन आणि स्टायलीश आहे. मोठ्या टँकमुळे ही बाईक एक्सट्रीम १५० सारखीच दिसते. बाईकला असलेल्या मोठ्या आणि आकर्षक हेडलॅम्पला एलईडी डीआरएलचं फिचर देण्यात आलं आहे. तसंच एलईडी टेललॅम्पही देण्यात आला आहे. ड्यूअल टोन पेंटसोबत ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे.


बाईकला मोठा पेट्रोल टँक, मोठं हॅण्डल आणि पातळ सीट देण्यात आली आहे. या बाईकची लांबी २०६२ एमएम, रुंदी ७७८ एमएम रुंदी आणि १०७२ एमएम उंची आहे. या बाईकचा व्हील बेस १३३८ एमएम आणि १६७ एमएम ग्राऊंड क्लियरन्स आहे. तसंच बाईकमध्ये रेडियल टायरचा प्रयोग करण्यात आला आहे.


एक्सट्रीम २०० आर या बाईकला डिस्क ब्रेकसोबतच एबीएसचा पर्यायही देण्यात आला आहे. या बाईकच्या किंमतीबाबत कंपनीनं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण या बाईकची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे. या बाईकची स्पर्धा बजाज पल्सर एनएस २०० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही सोबत असेल.