New Hero Passion Plus Price Features: ऑटो क्षेत्रामध्ये दर दिवशी एक नवं तंत्रज्ञान पाहायला मिळतं. बरं या तंत्रज्ञानाचा वापर करत वाहनांमध्येही नवनवीन आविष्कार झाल्याचं दिसून येतं. विविध वाहन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन मॉडेल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येते. त्यातलंच एक नाव म्हणजे हिरो मोटोकॉर्प. नुकतंच या कंपनीकडून  पैशन+ ही बाईक नव्या फिचर्स आणि कम्फर्टसह लाँच करण्यात आली आहे. ज्यामुळं खेड्यापासून शहरांपर्यंत अनेकांच्याच यादीत ही बाईक असू शकते यात वाद नाही. 


काय आहे बाईकची किंमत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरोच्या पॅशन प्लस बाईकबद्दल सांगावं तर, सध्या ही बाईक अनेक हिरो मोटोकॉर्प डिलरशिप स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. ज्याची Ex Showroom किंमत 76,301 असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ग्रे आणि ब्लॅक विथ नेक्सस ब्लू अशा तीन रंगांमध्ये ही बाईक तुम्ही खरेदी करु शकता. 


पॅशन प्लसचे फिचर्स... 


पॅशन प्लसमध्ये डिजिटल अॅनालॉग क्लस्टर असून, यामध्ये हेडलाईट इंडिकेटर, टर्न इंडिकेटर, फ्यूल गेज, स्पीडोमीटर, ट्रीप मीटर, ऑडोमीटर, साईड स्टँड इंडिकेटर, i3s बटन असे फिचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळं बाईक चालवताना रायडरला कोणताही त्रास होणार नाही. 


बाईकच्या इंजिनविषयी सांगावं तर, यामध्ये 100cc चं BS-VI आणि OBD-2 कंप्लायंट इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनमधून  8000 rpm वर 5.9 किलोवॉटचं पॉवर आऊटपुट आणि  6000 rpm वर 8.05 न्यूटन मीटर चा पिक टॉर्क जनरेट करते. 


हेसुद्धा वाचा : निसर्गसौंदर्यानं नटलेल्या 'रोहतांग पास'च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं...


नव्या पॅशन प्लसमध्ये रायडर आणि पिलीयनसाठी एकाच सीटची व्यवस्था करून देण्यात आली आहे. एर्गोनॉमिक ट्रायंगलच्या सहजतेमुळं रायडिंगचा अनुभव द्विगुणित होत आहे. बाईकवर असणाऱ्या लक्षवेधी ग्राफिक्समुळे ती रस्त्यावर अनेकांच्याच नजरा वळवताना दिसत आहे. हिरोच्या पॅशन बाईकला मिळालेली पसंती पाहता आता त्यात आणखी काही दमदार फिचर्स दिल्यानंतर पॅशन प्लस एका नव्या ढंगात सादर करण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काळात तुम्हीही बाईक घ्यायच्या विचारात असाल आणि खिळाला परवडेल अशा दरात तुम्हाहा बाईक हवी असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता.