Hero splendor Plus New Bike: हिरोच्या बाइक्सना देशात सर्वाधिक मागणी आहे. तुम्हीही स्वस्त बाइकच्या शोधात असाल, तर हिरो कंपनीने तुमच्यासाठी एक नवीन पर्याय आणला आहे. हिरोच्या एकापेक्षा एक सरस बाइक भारतीय बाजारात आहे.  हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनीने नवीन स्प्लेंडर लाँच केली आहे. स्प्लेंडर बाइक लोकप्रिय बाइक्समध्ये गणली जाते. दर महिन्याला सुमारे अडीच लाख युनिट्सची विक्री होते. विशेष बाब म्हणजे या बाइकची किंमत कमी असली तरी मायलेज चांगला आहे. खरं तर, कंपनीने स्प्लेंडर प्लस या त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मोटारसायकलसाठी नवीन पेंट स्किम सादर केली आहे. हीरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर प्लसचा नवीन सिल्व्हर नेक्सस ब्लू कलर व्हेरिएंट लाँच केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hero splendor Plus New Bike Price


नवीन कलर ऑप्शनसह या स्प्लेंडर प्लसची किंमत 70,658 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या नवीन रंगासह, ही एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल आता एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. नवीन पेंट स्कीम व्यतिरिक्त, मोटरसायकल तशीच आहे. 


इंजिन आणि शक्ती


हीरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर प्लसमध्ये 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिन आहे. हे 8,000 RPM वर 7.9 bhp आणि 6,000 RPM वर 8.05 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. यात हिरोची i3S निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप सिस्टीम देखील मिळते, त्यामुळे मायलेज वाढवण्यास मदत करते. यात टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक शोषक आहेत.


Affordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज


सध्या, नवीन हीरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर प्लसची किंमत 70,658 रुपयांपासून सुरू होते आणि 72,978 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीने अलीकडे हीरो स्प्लेंडर XTEC ही स्प्लेंडरची हाय-टेक मॉडेल सादर केलं आहे.