Affordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज

देशात गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत. 

Updated: Sep 15, 2022, 08:24 PM IST
Affordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज title=

Upcoming Affordable Electric Cars: देशात गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केट झपाट्याने वाढत आहे. टाटा मोटर्स सध्या पॅसेंजर इव्ही मार्केटमध्ये जवळपास 80% मार्केट शेअरसह राज्य करत आहे. पण भविष्यात गोष्टी बदलू शकतात कारण अनेक ब्रँड्स ईव्ही स्पेसमध्ये प्रवेश करत आहेत. अलीकडेच महिंद्राने आपली नवीन XUV400 इलेक्ट्रिक SUV सादर केली आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. पण, सध्या लोकांकडे परवडणाऱ्या इव्हीसाठी फारसे पर्याय नाहीत. मात्र, आता काही स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. या गाड्यांची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

TATA TIAGO EV: टाटा मोटर्सने अधिकृतपणे 10 नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल लाँच करण्याची घोषणा केली आहे.  विविध सेगमेंट, बॉडी स्टाइलसह परवडणाऱ्या असतील. यात टाटा टियागो इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. सप्टेंबरच्या अखेरीस लाँच होणार आहे. टाटा मोटर्सची ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असेल. टाटा टियागो इव्ही 26kWh किंवा 30.2kWh बॅटरी पॅकसह येण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकते.

CITROEN C3 EV: Citroen भारत आणि ब्राझीलमधील बाजारपेठ पाहता एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार तयार करत आहे. कंपनी C3 हॅचबॅकवर आधारित सर्व-नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या गाडीचं डिसेंबर 2022 पर्यंत अनावरण केले जाऊ शकते आणि यानंतर 2023 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केले जाऊ शकते. नवीन मॉडेल सीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे अनेक बॉडी स्टाइल आणि पॉवरट्रेनसह येईल. ही 300 किमीची रेंज देणारी कार देखील असू शकते.

MG SMALL EV: एमजी मोटर इंडियाने आपल्या नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारची चाचणी सुरू केली आहे. 2023 च्या पहिल्या सहामाहीत लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे Wuling Air EV वर आधारित असेल. या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये डेब्यू झाला होता. भारतीय बाजारात त्याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असू शकते.