हिरोची २०० सीसीची स्वस्त बाईक लॉन्च
हिरो मोटो कॉर्पनं त्यांची नवीन बाईक हीरो एक्सट्रीम २०० आर लॉन्च केली आहे.
मुंबई : हिरो मोटो कॉर्पनं त्यांची नवीन बाईक हीरो एक्सट्रीम २०० आर लॉन्च केली आहे. २०० सीसी सेगमेंटमध्ये ही बाईक स्वस्त असल्याचं बोललं जात आहे. एक्सट्रीम २०० ला कंपनीनं पहिल्यांदा ऑटो एक्सपो २०१६ मध्ये दाखवलं होतं. पण यानंतर २ वर्षांनी ही बाईक लॉन्च केली. हीरो एक्सट्रीम २०० आरचं डिझाईन एक्सट्रीम स्पोर्ट्सची मिळतं जुळतं आहे.
सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन
या बाईकमध्ये डिजीटल-एनॉलॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. १९९.६ सीसी असलेल्या या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये ५ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. हीरोच्या या बाईकची किंमत ८८ हजार रुपये आहे. कंपनीनं ही किंमत त्यांच्या वेबसाईटवरही दिली आहे.
फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक
या बाईकला फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. पुढच्या चाकाला २७६ एमएम आणि मागच्या चाकाला २७६ एमएमचा डिस्क ब्रेक आहे. एक्सट्रीम २०० आरला स्कल्पटेड टँक, एजी टेल सेक्शन या बाईकला स्पोर्ट लूक देतं. बाईकच्या इंजिनाची पॉवर 18.3 bhp आहे आणि १७.१ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट होतं. या बाईकला नव्या डायमंड फ्रेमवर बनवण्यात आलं आहे.