गाड्यांची चोरी थांबवण्यासाठी सरकारचा नवा प्लान
सरकारचा महत्वाचा निर्णय
मुंबई : नवीन गाडी खरेदी केल्यावर चिंता असते ती गाडीची... म्हणजे गाडी कुठे चोरीला तर जाणार नाही ना? हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो. आता गाडी खरेदी केल्यावर ग्राहकांना हाय सिक्युकिटी रजिस्ट्रेशन प्लेटची वाट पाहावी लागणार नाही.
तसेच वेंडरकडून ती लावून घेण्यासाठी दोन शब्द खर्च करावे लागतील. राज्य मार्ग परिवहन मंत्रालयाने ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्टर्ससाठी गाडीसोबत एचएसआरपी देण्याचे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.
तसेच गाडी विकण्याअगोदर त्यावर ही नंबर प्लेट लावणे डीलर्स महत्वाचे असल्याचे देखील सांगितले. ही व्यवस्था एप्रिल 2019 पासून सुरू होणार आहे.
वाहन निर्माता कंपनी थर्ड रजिस्ट्रेशन मार्क देखील तयार करणार आहे. ज्यामध्ये गाडीत वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल / डिझेलकरता कलर कोडिंग देखील आहे. गाडी शोरूमच्या बाहेर पडण्याअगोदर त्यावर अधिकृ डिलर्स वींड शील्ड देखील लावणार आहेत.
तसेच विकल्या गेलेल्या गाड्यांकरता रजिस्ट्रेशन मार्क लावल्यानंतर निर्माता कंपनीकडून सप्लाय केलेल्या गाड्यांना हे नंबर प्लेट कंपनीचे डीलर्स देखील लावू शकतात.
चोरांपासून होणार गाडीचं रक्षण
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट पाच वर्षांच्या गॅरंटीसह मिळणार आहे. थर्ड रजिस्ट्रेशन मार्क एकदा लावून काढल्यानंतर ते खराब होणार आहे. स्टिकरमध्ये रजिस्ट्रेशन करणारी अथॉरिटी, रजिस्ट्रेशन नंबर, लेजर ब्रँडेड परमानेन्ट नंबर, इंजिन नंबर आणि चेसिस नंबरची माहिती असणार आहे. यामुळे हे वाहन चोरांपासून सुरक्षित असणार आहे.