Honda Shine 100: Splendor ला टक्कर देण्यासाठी Honda च्या बाईकची एंट्री, दमदार फिचर्स अन् किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी
Honda Shine 100: Honda ने Shine 100 च्या रुपात आपली स्वस्त दुचाकी लॉन्च केली आहे. किंमत आणि फिचर्सच्या बाबतीत ही बाईक Hero Splendor Plus ला टक्कर देत आहे. Honda Shine 100 मध्ये कंपनीने 100 सीसी क्षमतेचं ओबीडी 2 (OBD-2) कम्प्लायंट इंजिन दिलं आहे. म्हणजे हे इंजिन 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकतं.
Honda Shine 100: होंडा मोटारसायकल स्कूटर इंडियाने (HMSI) बाजारात नवी दुचाकी आणली आहे. होंडाने Honda Shine 100 च्या माध्यमातून आपली स्वस्त दुचाकी बाजारात आणली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या दुचाकीची किंमत फक्त 64 हजार 900 रुपये (Ex Showroom) आहे. देशभरात 100 सीसी दुचाकींना पसंती असून यासाठीच होंडाने या सेगमेंटमध्ये आपली नवी दुचाकी लाँच केली आहे. होंडाची ही दुचाकी हिरो मोटोकॉर्पची सर्वाधिक विक्री होणाऱ्या Hero Splendor Plus ला टक्कर देण्याची शक्यता आहे.
होंडाने Shine 100 ला साध्या प्रवासी दुचाकीप्रमाणे डिझाईन केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, Shine 100 मध्ये पूर्णपणे 100 सीसी क्षमतेचं ओबीडी 2 (OBD-2) कम्प्लायंट इंजिन देण्यात आलं आहे. याचा अर्थ हे इंजिन 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकतं. या इंजिनमध्ये PGM-FI तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. तसंच eSP सिस्टम देण्यात आलं आहे.
याचं इंजिन हलकं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, यामध्ये पिस्टन कूलिंग जेट फिक्शनचं काम करते जे इंजिनचं तापमान कमी ठेवतं. 99.7 सीसीचं हे इंजिन 7.61hp पॉवर आणि 8.05Nm चा टॉर्क जनरेट करतं.
दुचाकीवर मोठी सीट देण्यात आल्याने दूरच्या प्रवासातही फायद्याची आहे. सीटची उंची 786 मिमी ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंजिनला स्टार्ट होण्यापासून थांबवतं. जर चालकाने साईड स्टॅँड काढलं नाही, तर दुचाकी सुरु होणार नाही. यामध्ये कॉम्बी ब्रेक सिस्टम देण्यात आला आहे.
Shine 100 ला नव्या डायमंड टाइप फ्रेम चेचिसवर तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्वीन शॉक एब्जॉर्बर सस्पेंशन देण्यात आलं आहे. किंमत पाहता दोन्ही चाकांमध्ये फक्त ड्रम ब्रेकचा पर्याय आहे. बाइकचं वजन 100 किलोपेक्षा कमी आहे. खराब रस्त्यांवर चांगल्या आणि आरामदायी प्रवासासाठी 168 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.
एंट्री लेव्हल दुचाकी असल्याने यामध्ये फार अॅडव्हान्स फिचर्स उपलब्ध नाहीत. मात्र इतर सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही बाईक पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Hero Splendor Plus मध्ये कंपनीने 97.2 cc क्षमतेचे इंजिन वापरले आहे, जे 5.9 kW ची पॉवर आणि 8.05 N-m टॉर्क जनरेट करते. याची सुरुवातीची किंमत 72,076 रुपये आहे. दुसरीकडे, नवीन Shine 100 ची किंमत 64,900 पासून सुरू होते. कंपनी या बाईकbj विशेष 6 वर्षांचे वॉरंटी पॅकेज देखील देत आहे. या बाईकचे बुकिंग सुरू झाले असून कंपनी मे महिन्यापासून डिलिव्हरी करणार आहे.