Honda Activa E and QC1 Unveil: भारतीय बाजारात होंडा कंपनी एक विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखले जाते. गेल्या कित्येक दिवसांपासून ग्राहकांमध्ये होंडाच्या दोन इलेक्ट्रिकल दुचाकींची चर्चा आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया Honda Motorcycle and Scooter India (HMSI) कडून आज दोन नव्या स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत. होंडाकडून इलेक्ट्रिक स्कूटर सिगमेंटमध्ये Honda Activa E आणि QC1 स्कूटर लाँच करण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये काय फिचर्स असतील याची किंमत किती असेल, हे सर्व काही जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडा कंपनीने भारतीय बाजारपेठेत Electric Vehicle म्हणून Honda Activa E आणि QC1 लाँच केले आहेत. या दोन्ही स्कूटर्समध्ये कमाल फिचर्स देण्यात आले आहेत. 


कसे आहेत फिचर्स?


कंपनीकडून Honda Activa Electric स्कूटरप्रमाणेच फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून यात रोड सिंक अॅप देण्यात आले आहे. यात ओटीए अपडेट, कॉल सर्व्हिससाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. Activa E मध्ये कंपनीकडून मोठी सीट, स्मार्ट की, युएसबी सी आणि हुक, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, इनबिल्ट जीपीएस, डे आणि नाइट मोड, नेव्हिगेशन सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 


दमदार बॅटरी आणि मोटर


Honda Activa E मध्ये 6KW क्षमतेच्या दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. यामुळं 80 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येऊ शकेल. यात होंडा अॅक्टिव्हा E मध्ये 102 किमीची रेंज मिळते.


वॉरंटी 


तीन वर्ष किंवा 50 हजार किमीपर्यंतची वॉरंटी देण्यात येणार आहे.  ही वॉरंटी फिक्स आणि रिमुव्हेबल बॅटरी असणाऱ्या स्कूटरमध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर स्कूटरसाठी दोन पॅकेजदेखील देण्यात येणार आहेत. यात बेसिक पॅकेजमध्ये तीन वर्षांची वॉरंटी, तीन फ्री सर्व्हिस, एक वर्षांचा रोड साइड असिस्टेंस देण्यात आलं आहे. 


किंमतीची घोषणा कधी होणार?


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्ये दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीची घोषणा केली जाणार आहे. 


कोणाशी होणार मुकाबला?


होंडाकडून पहिली Electric Scooter म्हणून लाँच केली जाणारी Honda Activa Electric स्कूटरचा सामना बाजारात थेट Ola, Ather, Vida, TVS iQbue और Chetak सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत होणार आहे.