मुंबई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात ११० सीसीची क्लिक स्कूटर लॉन्च केली आहे. ह्या स्कूटरची किंमत ४२,४९९ रुपये इतकी आहे.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाच प्रा. लि.चे एक्झिक्यूएटिव्ह ऑफिसर मिनोरू कातो यांनी सांगितले की, १००-११० सीसी सेगमेंटच्या ऑटोमॅटीक स्कूटरची भारतीय बाजारात वाढत्या मागणीनुसार होंडाची 'क्लिक स्कूटर'ही ग्राहकांना आवडेल.
क्लिक स्कूटर चार रंगामध्ये लॉन्च केली आहे. स्कूटरचे वजन कमी असून स्कूटरची सीट आरामदायक, लांब आणि रुंद आहे त्यामुळे ग्राहकांना समाधान प्रदान करेल असे कंपनीचे उपाध्यक्ष यादवेंद्र सिंह यांनी सांगितले.