नवी दिल्ली : Honda स्कूटरच्या किंमतीत लॉकडाऊनदरम्यान वाढ झाली आहे. कंपनीने भारतात Honda Activa 6G आणि Activa 125च्या BSVI व्हर्जनच्या किंमतीत वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कंपनीने किंमतीत वाढ केली आहे. स्कूटरच्या किंमतीत 550 रुपयांची वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंमतीतील ही वाढ Activa 6G आणि Activa 125 च्या सर्व वेरिएन्टवर लागू आहे. 
- BS VI Activa 125 च्या ड्रम ब्रेक वेरिएन्ट एक्स शोरुम किंमत वाढून दिल्लीत 68042 रुपये 
- Aloy Wheel, Drum Variantची किंमत 71542 रुपये 
- अलॉय व्हील, डिस्क वेरिएन्टवरची किंमत 75042 रुपये
- Activa 6Gच्या स्‍टँडर्ड वेरिएन्टची X Showroom किंमत दिल्‍लीत 64,464 रुपये
- DLX वेरिएन्टची किंमत 65964 रुपये इतकी झाली आहे.


याआधी Honda Motorcycle & Scooter Indiaने आपल्या विक्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला. कंपनीने विक्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये वाहनांची विक्री कमी होत असल्याने BS IV Twowheeler इन्‍वेनटरी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी BS IV वाहनांचा लॉट, जी वाहनं आतापर्यंत विकली गेली नाहीत, ती बाय बॅक करणार आहे. 


कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने Hondaने वाहनांची सर्व्हिस आणि वॉरंटी दीड ते दोन महिन्यांपर्यंत वाढवली आहे. 15 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान लॉकडाऊनमध्ये ग्राहकाxच्या वाहनाची वॉरंटी संपत असल्यास ती पुढे वाढवण्यात येणार आहे.