Honor 7S स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स...
स्मार्टफोनप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. आता आणखीन एक फोन बाजारात लॉन्च झाला आहे. Huawei चा ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवा Honor 7S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे नुकत्याच लॉन्च झालेल्या Honor Play 7 चं नवं व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे.
नवी दिल्ली : स्मार्टफोनप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. आता आणखीन एक फोन बाजारात लॉन्च झाला आहे. Huawei चा ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवा Honor 7S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे नुकत्याच लॉन्च झालेल्या Honor Play 7 चं नवं व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे.
स्मार्टफोन ग्लोबल वेबसाईटवर
कंपनीने सध्या Honor 7S हा स्मार्टफोन ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट केला असून पाकिस्तानमध्ये लॉन्च केला आहे. पाकिस्तानमध्ये या स्मार्टफोनची किंमत 14,499 PKR म्हणजेच भारतात जवळपास 8,400 रुपये आहे. पाहूयात या फोनचे फिचर्स आणि किंमत काय आहे.
Honor 7S फोनचे फिचर्स
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टवर चालणारा Honor 7S अँड्रॉईड ओरियोवर चालतो. या फोनमध्ये 5.45 इंचाचा HD+ (720x1440 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2GB रॅम सोबत क्वॉड-कोअर MediaTek MT 6739 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची इंटरनल मेमरी 2GB आहे. ही मेमरी मेमरी कार्डच्या सहाय्याने 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 3020 mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.
Honor 7S फोनचा कॅमेरा
कॅमेऱ्याचं बोलायचं झालं तर या स्मार्टफोनच्या रियरमध्ये PDAF आणि LED फ्लॅशसोबत 13 MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फ्रँटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
आय प्रोटेक्शन मोड
Honor 7S या स्मार्टफोनमध्ये आय प्रोटेक्शन मोड ही देण्यात आलं आहे. या मोडमुळे डिस्प्लेवर ब्ल्यू लाईट फिल्टर येतं आणि त्यामुळे वाचण्यास सोपं जातं.
Honor ने काही दिवसांपूर्वीच Honor 7A आणि Honor 7C भारतात लॉन्च केले होते. या फोन्सची क्रमश: किंमत 8,999 रुपये आणि 9,999 रुपये आहे. ग्राहक Honor 7A हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरुन आणि Honor 7C हा स्मार्टफोन अॅमेझॉनवरुन खरेदी करु शकतात.