नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन दिग्दज हुआवेईचा बहुप्रतिक्षित 'ऑनर ८ प्रो' भारतात गुरुवारी लॉन्च झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ जीबी रॅम क्षमता असणाऱ्या हा स्मार्टफोन वनप्लसला ५ (६जीबी / ६४ जीबी) चांगलंच आव्हान देणार आहे. 'ऑनर ८ प्रो' एक्सक्लुझिव्हली अमेझॉनच्या प्राईम सदस्यांसाठी अमेझॉन प्राईम डेवर १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता लॉन्च केला जाणार आहे. 


या फोनची स्क्रीन ५.७ इंचाची आहे. यामध्ये १२८ जीबी स्टोअरेज क्षमता आहे. मेमरी कार्डच्या साहाय्यानं २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. २के क्षमातेचा क्वॉड एचडी डिस्प्ले आहे. तसंच या फोनमध्ये ४,००० एमएएचची बॅटरी आहे. किरिन ९६० प्रोसेसर यामध्ये आहे... तसंच यात नवीन ईएमयूआय ५.१ सॉफ्टवेअर आहे. 


हा ड्युएल सिमचा स्मार्टफोन अँन्ड्रॉईड नूगा ७.० वर आधारित आहे... आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही यात आहे.


'ऑनर ८ प्रो' या स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपये निर्धारित करण्यात आलीय.