अबब! 200 MP कॅमेरा, आक्रोड फोडला तरी फुटणार नाही इतकी दणदणीत स्क्रीन; iPhone, Samsung ला तगडी स्पर्धा
Honor ने भारतीय बाजारपेठेत कमबॅक करत आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये तब्बल 200 मेगापिक्स कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच याशिवाय अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.
Honor ने भारतीय बाजारपेठेत कमबॅक केलं आहे. कंपनीने आपला Honor 90 5G हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. या मोबाईलमध्ये तब्बल 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच अनेक AI फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या मोबाईलमध्ये अनेक कॅमेरा मोड्स देण्यात आले आहेत, जे तुम्हाला दैनंदिन वापरात उपयोगी ठरु शकतात. या हँडसेटमझ्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चा वापर करण्यात आला आहे.
या मोबाईलमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 66W व्हॉल्टचा चार्जर मिळतो. या हँडसेटला तीन रंगाच्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. डायमंड सिल्वर, एमराल्ड ग्रीन और मिडनाइट ब्लॅक या रंगात हा मोबाईल उपलब्ध आहे.
Honor 90 5G मधील स्पेसिफिकेशन
Honor 90 5G मध्ये 6.7 इंचाता AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं रेझोल्यूशन 1.5K (2664 x 1200 pixels) आहे. यामध्ये युजर्ससाठी 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामध्ये 1600 Nits ची पीक ब्राइटने्स मिळते. याची स्क्रीन फार मजबूत असल्याचा कंपनीचा दावा आहे. चाचणीदरम्यान, कंपनीने स्क्रीनवरून अक्रोड तोडल्याचेही दाखवले आहे.
Honor 90 5G चा प्रोसेसर आणि रॅम
Honor 90 5G मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो Adreno 644 GPU सह येतो. यामध्ये 12GB LPDDR5 चा RAM आणि 256GB ची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झाल्यास हा फोन Android 13 वर आधारित Magic OS 7.1 वर काम करतो.
Honor 90 5G चा कॅमेरा सेटअप
Honor 90 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 200 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा Honor Image Engine सपोर्टसह मिळतो. यामध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा लेन्स सेन्सॉर आहे. तिसरा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. व्हिडओ कॉलिंगसाठी फ्रंटला 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत किती? ऑफर्स काय आहेत?
Honor 90 5G ने सुरुवातीच्या व्हेरियंटची किंमत 37 हजार 999 रुपये ठेवली आहे. यामध्ये 8GB+256GB स्टोरेज व्हेरियंट मिळेल. तर 12GB+512GB व्हेरियंटसाठी 39 हजार 999 रुपये खर्च करावे लागतील 15 सप्टेंबरला अॅमेझॉनवर या मोबाईलवर सेल असणार आहे.
काही युजर्सना Early Bird ऑफर अंतर्गत सुरुवातीचा व्हेरियंट 27 हजार 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर 12 जीबी रॅम व्हेरियंट 29 हजार 999 रुपयात खरेदी करु शकतात. अॅमेझॉनवर एक्स्चेंज केल्यास 2000 रुपयांचा बोनस मिळणार आहे.