मुंबई : ई-कॉमर्स साईट्सपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर नुकत्याच लॉन्च झालेल्या Honorच्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्टवर Honor 9i आणि Honor 8 Pro खरेदी केल्यास डिस्काऊंट मिळणार आहे. ही डिस्काऊंट ऑफर हॉनर सेलिब्रेशन अंतर्गत दिली जात आहे.


काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Honor 9i या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 19,999 रुपयांचा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवर 17,999 रुपयांत मिळत आहे. 


फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन खरेदी करताना 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट देण्यात येत आहे. 


तर, Honor 8 Pro या फोनवर 4,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट दिला जात आहे. हा फोन 29,999 रुपयांत लॉन्च केला होता. मात्र, डिस्काऊंटमुळे हा फोन ग्राहकांना 25,999 रुपयांत मिळत आहे. तसेच, 18,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदाही तुम्ही घेऊ शकता. अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त डिस्काऊंट देण्यात येत आहे.


Honor 8 Pro मध्ये 5.7 इंच QHD (1440x2560 पिक्सल) LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 6GB रॅम सोबतच 1.8GHz ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची इंटरनल मेमरी 64GB असून ही मेमरी एसडी कार्डच्या सहाय्याने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते.