आता एकाच फोनमध्ये दोन WhatsApp Account वापरणे शक्य; फक्त या स्टेप्स फॉलो करा
एकाच फोनमध्ये दोन किंवा दोन व्हॉट्सअॅप चालवायचे असतील, तर ते कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईमध्ये तुम्हाला हे अॅप मिळेल. जे भारतातच काय तर सगळ्या देशात वापरले जाते. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काहीतरी वेळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्वी एका मोबाईलमध्ये एकच WhatsApp Account वापरण्याची सुविधा होती. ज्यामुळे लोकांकडे वेगवेगळे फोननंबर किंवा सिमकार्ड असून देखील त्यांना एकच WhatsApp Account वापरावे लागत होते.
सुरूवातीला जेव्हा लोकांना फोनमध्ये दोन WhatsApp Account खोलण्यासाठी बिझनेस अॅप डाउनलोड करावे लागायचे किंवा मग दुसरा फोन खरेदी करावा लागायचा. परंतु आता WhatsApp च्या बदललेल्या पॉलिसिमुळे आणि स्मार्टफोनच्या अपडेशनमुळे आता बऱ्याच मोबाईलमध्ये एका वेळेला दोन WhatsApp Account उघडले जाऊ शकते.
त्यामुळे जर तुम्हाला व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप डाउनलोड करायचे नसेल आणि एकाच फोनमध्ये दोन किंवा दोन व्हॉट्सअॅप चालवायचे असतील, तर ते कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही दोन WhatsApp Account एका फोन मध्ये चालवू शकता. फोन.
तुमच्या फोनमध्ये दोन WhatsApp Account सेट करण्यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर खाली स्क्रोल करा. येथे तुम्हाला अॅप्लीकेशन आणि परमिशनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि अॅप क्लोन पर्यायावर टॅप करा.
या अॅप क्लोनमध्ये तुम्हाला तुमच्या फोनमध्ये उपस्थित असलेले सर्व अॅप्स दिसतील. आता WhatsApp वर क्लिक करा आणि Clone App पर्याय चालू करा. यानंतर तुमच्या फोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप इंस्टॉल होतील आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या नंबरवरून क्लोन अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये टाकून ते सुरू करु शकता.
जर तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन क्लोन फीचर मिळत नसेल, तर तुम्ही अॅप क्लोन, ड्युअल अॅप किंवा ट्विन अॅप टाइप करून सर्च बारमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि ते तुम्हाला क्लोन अॅप फीचरकडे निर्देशित करेल.
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनेक फोनमध्ये हे वैशिष्ट्य नसते. अशा परिस्थितीत, दोन -दोन व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी, तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हे अॅप डाउनलोड करा आणि दोन व्हॉट्सअॅप चालवा
गुगल प्ले स्टोअरवरून Parallel Space सारखे क्लोनिंग अॅप डाउनलोड करावे लागेल. हे अॅप क्लोन वैशिष्ट्याप्रमाणे काम करते. तथापि, लवकरच व्हॉट्सअॅप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट देणार आहे. याचा अर्थ असा की, मुख्य साधनामध्ये इंटरनेट नसले, तरी तुम्ही एकाच वेळी चार उपकरणांमध्ये व्हॉट्सअॅप वापरू शकाल.