मुंबई : लोकं सध्या इंटरनेटवर जास्त अवलंबून राहात असतात. कोणतीही गोष्ट माहित करुन घ्यायची असेल किंवा रस्ता शोधायचा असेल, तरी लोक इंटरनेटचाच वापर करतात. त्यात आता रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. पूर्वी लांब जाण्यासाठी लोकांना नकाशा वापरावा लागयचा आणि तरीही काही माहिती हवी असेल तर, आजूबाजूच्या लोकांना विचारुन लोकं मार्ग काढायचे. परंतु आता Google मॅप आल्यामुळे सगळंच सोपं झालं आहे. यामुळे तुम्हाला रस्ता, रहदारी, किती वेळ लागेल? या सगळ्याची माहिती मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही ही रस्ता शोधण्यासाठी किंवा कोणत्यातरी ठिकाणावर जाण्यासाठी गुगल मॅपचा अनेकदा वापर केला असावा, पण तुम्ही कधी विचार केला आहे की हा गुगल मॅप कसा काम करतो? आणि या गुगल मॅपला त्या ठिकाणावर पोहोचण्याची वेळ कशी कळते? अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत की गुगल मॅप नक्की कसे काम करते?


ट्रॅफिक जाम कुठे आहे हे कसे कळतं?


कुठे जाम लागला आहे किंवा कुठे ट्राफीक जास्त आहे हे माहित करुन घेण्यासाठी गुगल मॅप त्या रस्त्यावरील गाड्यांमध्ये बसलेल्या लोकांचे मोबाईल ट्रॅक करतो. ज्यामुळे गुगलला याबद्दलची सगळी माहिती मिळते. यामध्ये गुगल गाड्यांची स्पीड आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या संख्यांच्या आधारे गुगलला डेटा मिळतो.


गेल्या वर्षी, बर्लिनच्या एका रस्त्यावर एका व्यक्तीने एक एक्प्रिमेंट केला होता. तो एका टोपलीत 99 फोन घेऊन एका पूर्णपणे रिकामी रस्त्यावर गेला. आणि त्याने एक मोबाईलवर पाहिले तर त्या ठिकाणी त्याला ट्राफीक जाम दिसले. परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. यावरून हे समजले जाऊ शकते की, अधिक फोन आणि त्यांचे लोकेशन चालू असल्यामुळे कोणत्या ठिकाणी किती रहदारी आहे हे गुगलला समजते.


गुगल मार्गाची हिस्ट्री देखील पाहातो


आपण निवडलेल्या मार्गावर नेहमी रहदारी कशी असते याचा हिस्ट्रीमधील डेटा देखील तो पाहातो. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीवरुन गुगल तुम्हाला त्या रस्त्यावर किती वेळ लागेल हे सांगतो.
 परंतु हे देखील लक्षात घ्या की, ही वेळ प्रत्येक वेळी वेगळी अशू शकते. तसेच गुगलने दाखवलेल्या वेळेपेक्षा तुम्हाला कमी जास्त वेळ देखील लागू शकतो. हे सगळं तुम्ही कोणतं वाहान चालवता आणि ते कोणत्या वेगाने चालवता यावरती देखील अवलंबून आहे.


Google इतर लोकांच्या डेटानुसार ईटीए काढतो, ज्याला एस्टिमेटेड टाइम ऑफ अराईव्हल असेही म्हणतात. म्हणजेच, ही फक्त एक संभाव्य वेळ आहे, जो अंतर, रहदारीची परिस्थिती आणि मार्ग यावर आधारित असते.


या व्यतिरिक्त, त्या भागाचा डेटा किंवा रस्त्याची वेग मर्यादा इत्यादी देखील त्यात जोडले जातात आणि नंतर संभाव्य वेळ काढला जातो. म्हणूनच असे दिसून आले आहे की, महामार्ग किंवा मोठ्या रस्त्यावर हा डेटा अधिक अचूक असतो कारण तेथे रहदारी कमी असते.