मुंबई: अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते. बरेचदा आपल्याला असे वाटते की आपल्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी वापर करत नाही ना? आता असे वाटले तर काळजी करण्याचं काम नाहीये. कारण तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टिव आहेत ते माहिती करु शकतात ते कसे चला आपण जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच काहीवेळेस मोबाईल फोन हरवल्यानंतर नवीन सिम मिळते. ते जुन्या सिमची काळजी घेत नाहीत. जर तुमचे जुने सिम तुमच्या card आधार क्रमांकाशी लिंक झाले असेल आणि त्यातून काही गैरप्रकार घडत असतील तर तुमच्या आधार लिंकमुळे तुम्ही पोलिसांच्या चौकशीत किंवा तपासातही येऊ शकताय म्हणूनच तुमच्या आधारशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे एकदा तपासणे आणि तुम्ही वापरत नसलेले सिम बंद करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमचा आयडी वापरून सिमकार्ड विकत घेतले आहे आणि ते वापरत आहे. तर तुम्ही आता त्याची माहिती ऑनलाइन मिळवू शकता.  एवढेच नाही तर ती सिमकार्डही तुम्ही ब्लॉक करू शकता.



असे करा सिम ब्लॉक 


1. सर्वात आधी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा.


2. यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP नमूद करा.


3. आता तुम्हाला सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.


4. येथे वापरकर्ते अशा क्रमांकांना ब्लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही.