SD कार्ड खरेदीसाठी हे आहेत पर्याय....
स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
SD कार्डचा वापर काय?
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये गेम, मुव्ही, डॉक्यूमेंट, तसे, व्हिडिओ, MP3, पीडीएफ फाईल्स, इमेज यांसारख्या अनेक गोष्टी साठवून ठेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या फोनची मेमरी क्षमता वाढते. तुमचा फोन छान चालतो. हॅंग होण्याचा धोका कमी होतो.
एकापेक्षा अनेक डिवाईसमध्ये वापर
मायक्रोएसडी कार्डचा उपयोग हा केवळ स्मार्टफोनच नव्हे तर, हाय-फीसर्सनीयुक्त अशा कॅमेऱ्यातही करता येतो. यासोबतच स्पीकर, टीव्ही, लॅपटॉप यांसारख्या गॅझेट्स मध्ये मायक्रोएसडी कार्डचा उपयोग होतो. बाजारात अल्प किमतीत विकल्या जाणाऱ्या लॅपटॉपप, स्मार्टफोनमध्ये अनेकदा मेमरी क्षमता कमी असते. अशा वेळी ही क्षमता वाढविण्यासाठी मायक्रोएसडी कार्डचा वापर करणे केव्हाही फायदेशीर.
SD कार्डच्या विविध गोष्टी....
सर्व कंपन्यांचे एसडी कार्ड भलेही एकसारखेच दिसते. पण, म्हणून ते एकसारखे असतेच असे नाही. प्रत्येक SD कार्डची खासीयत वेगवेगळी असते. काही मेमरी कार्डमध्ये अधिक वेगाने डेटा ट्रान्सफर होतो. तर, काही कार्डमध्ये अगदीच धिम्या गतीने. काही SD कार्डची मेमरी क्षमता जास्त. तर, काहींची अगदीच कमी असते.
कसे असतात एसडी कार्ड?
जवळपास सर्वच यूजर्स हे हाय-स्पीड वाले SD कार्ड वापरण्यास प्राधान्य देतात. पण, अशी कार्ड शोधने काहीसे कठीण आहे. कारण मेमरी कार्डमध्ये चार पद्धतीचे स्पीड क्लास असतात. जसे की, 2,4,6, आणि 10.
क्लास 2 - स्टँडर्ड व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी वापर केला जातो.
क्लास 4 आणि 6 - हाय डेफिनेशनसाठी एकदम भारी.
क्लास 10 - फास्टेस्ट व्हिडिओ आणि फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डींगसाठी वापर केला जातो.
SDची वेगवेगळी मेमरी क्षमता
प्रत्येक मेमरी कार्ड्सची क्षमता वेगवेगळी असते. वाढत्या क्षमतेनुसार यांचे प्रकारही चांगलेच बदलतात....
1-SD कार्ड: स्टोरेज क्षमता: 1 MB
2-SDHC कार्ड: स्टोरेज क्षमता: 4GB ते 32GB पर्यंत
3 - SDXC कार्ड: स्टोरेज क्षमता: 32GB ते 2 TB पर्यंत