नवी दिल्ली : 'फ्लिपकार्ट'ने (Flipkart) नुकत्याच संपलेल्या फेस्टिव महासेलबाबत (Festive Sale) अनेक दावे केले आहेत.  २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत हा महासेल सुरु होता. हा सेल संपल्यानंतर 'फ्लिपकार्ट'ने याबाबत काही आकडे जाहीर केले आहेत. ज्यात अनेक आश्चर्यकारक दावे करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक सेकंदाला एक टिव्ही विकला गेला असल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे. एका मिनिटांत ५०० ब्यूटी प्रोडक्ट्स, प्रत्येक तासाला १.२ लाख फॅशन प्रोडक्ट विकले. तर  दररोज २.४ लाख रुपयांचे हेडफोन विकले गेल्याचा दावा 'फ्लिपकार्ट'कडून करण्यात आला आहे.



कंपनीने आणखी दोन सर्वात आश्चर्यचकित करणारे दावे केले आहेत. ज्यापैकी एक म्हणजे, सेलदरम्यान कुंभ मेळ्यात आलेल्या भाविकांपेक्षा, १७ पट अधिक लोकांनी वेबसाइट व्हिजिट केल्याचा आश्चर्यकारक दावा कंपनीने केला आहे.


लोकांनी या सेलमधून खरेदी करत, जवळपास ८० अब्ज रुपयांची बचत केली असून, ऑनलाइन कस्टमर्समध्ये फ्लिपकार्टच्या या सेलची सर्वाधिक क्रेझ असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.



अशाप्रकारच्या फेस्टिव्ह सेलसह फ्लिपकार्टने ऑनलाइन शॉपिंगच्या क्षेत्रात आपली पकड मजबूत केली असल्याचे म्हटले जात आहे.