मुंबई : वाढती स्पर्धा आणि बदलत्या टेक्नोलॉजीच्या जगात टिकून राहण्यासाठी ट्विटर नियमित काही बदल करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच ट्विटरने ट्विट लिहण्यासाठी असणारी कॅरेक्टर लिमिट वाढवली होती. आता त्यापाठोपाठ ट्विट बुकमार्क करण्याची सोय आणली आहे. 


बुकमार्क करू शकाल ट्विट  


ट्विटरने आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड, ट्विटर लाईट आणि मोबाईल.ट्विटर .कॉम यावर ट्विट बुकमार्क करण्याची सोय खुली केली आहे. ही जगभरातील 300 मिलियन युजर्सना खुली करण्यात आली आहे.  


ऑक्टोबर 2017 साली ट्विटरने बुकमार्किंगसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली होती.  


कसं कराल  ट्विट बुकमार्क  


ट्विट बुकामार्क करण्यासाठी शेअर बटणवर क्लिक करा 


त्यानंतर तुम्हांला अ‍ॅड टू बुकमार्कचा ऑप्शन दिसेल 


 



 


कुठे पहाल बुकमार्क केलेले ट्विट ?


प्रोफाईल फोटोवर क्लिक करा 


त्यानंतर बुकमार्क केलेले सारे ट्विट्स Bookmarks या पर्यायमध्ये पाहता येणार आहेत.