Smartphone कारच्या Bluetooth शी Pair होत नसेल तर काय करावं? वाचा 3 खास Tips
Tips To Connect Car Infotainment System And Smartphone: अनेकदा कारमध्ये बसल्यानंतर आपल्याला गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोन सिस्टीमशी कनेक्ट करायचा असेल तर स्मार्टफोन कनेक्ट होत नाही. बऱ्याच प्रयत्नानंतरही स्मार्टफोन कनेक्ट होत नाही असंही होतं.
Tips To Connect Car Infotainment System And Smartphone: कारमधील प्रवास म्हणजे गाणी हवीच. अगदी आपल्या मोबाईलमधील प्लेलिस्ट असो किंवा रेडीओ असो गाडीतून प्रवास करताना गाण्यांची सोबत असेल तर प्रवास खरोखरच सुखकर होतो. हल्ली अनेक कंपन्या एन्फोटेनमेंट सिस्टीम (Car Infotainment System) ही कारमध्ये इनबिल्टच देतात. या स्मार्टफोन (Smartphone) थेट गाडीतील एन्फोटेनमेंट सिस्टीमशी कनेक्ट करुन गाण्यांचा आनंद घेता येतो. अनेक गाड्यांमध्ये तर कॉल रिसीव्ह करण्यापासून, नोटीफिकेशनपर्यंतच्या सुविधाही या एन्फोटेनमेंट सिस्टीममध्येच असतात. मात्र या एन्फोटेनमेंट सिस्टीमबरोबर स्मार्टफोन कनेक्ट करणं मोठं टास्क असतं. कधीतरी ब्लू टूथची रेंज मिळत नाही तर कधीतरी कनेक्शन सापडत नाही. मात्र तुमचा स्मार्टफोन एन्फोटेनमेंट सिस्टीमला कसा कनेक्ट करावा यासंदर्भातील काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी त्याचा बराच फायदा होईल. या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात..
रिस्टार्ट करा
तुमचा स्मार्टफोन कारमधील एन्फोटेनमेंट सिस्टीमशी कनेक्ट होत नसेल तर चिडचिड न करता केवळ स्मार्टफोन रिस्टार्ट करुन पाहा. तसेच कारमधील एन्फोटेनमेंट सिस्टीमही रिस्टार्ट करता येईल. डिव्हाइज रिस्टार्ट केल्यानंतर ते लगेच एन्फोटेनमेंट सिस्टीमशी कनेक्ट होतात.
सॉफ्टवेअर अपग्रेड करा...
वेळेवेळी आपल्या स्मार्टफोनचं तसेच एन्फोटेनमेंट सिस्टीमचं सॉफ्टवेअर अपडेट करणं आवश्यक आहे. या दोन्हीपैकी एखाद्या डिव्हाइजचं सॉफ्टवेअर अपडेट नसेल तर दोन्ही डिव्हाइज पेअर (कनेक्ट) होण्यास अडचणी निर्माण होतील. त्यामुळेच दोन्ही डिव्हाइजचे सॉफ्टवेअर कायम अपडेट असतील याची काळजी घेणं फायद्याचं ठरतं.
ब्लूटूथ कनेक्ट करताना ही काळजी घ्या
अनेकदा एन्फोटेनमेंट सिस्टीम ब्लूटूथने कनेक्ट करताना अडचणी येतात. एन्फोटेनमेंट सिस्टीमला ब्लूटूथने कनेक्ट करताना सिस्टीम ब्लूटूथ मोडवर आहे का तसेच स्मार्टफोनचं ब्लूटूथ ऑन आहे का हे तपासून पहावं. आपल्या स्मार्टफोनमध्ये एन्फोटेनमेंट सिस्टीमच्या नावाने पेअरिंग डिव्हाइज सर्च करावं आणि त्यानंतर ते कनेक्ट करावं.
तरीही कनेक्ट होत नसेल तर...
मात्र एवढं केल्यानंतरही तुमच्या कारमधील एन्फोटेनमेंट सिस्टीम स्मार्टफोनशी कनेक्ट होत नसेल तर आपल्या कारमधील युझर मॅन्यूअल वाचावे. यूजर मॅन्यूअलमध्ये स्मार्टफोन कनेक्ट करण्यासंदर्भातील सविस्तर टिप्स नक्कीच दिलेल्या असतात.