मुंबई : सध्याच्या काळात लोकं ऑनलाईन शॉपिंगकडे वळले आहेत. येथे शॉपिंग करणे हे लोकांच्या फायद्याचे ठरते कारण यासाठी त्यांना गाडीखर्च देखील करावा लागत आणि भरघोस ऑफर्स देखील उपलब्ध असतात, ज्यामुळे ऑनलाईन वस्तु खरेदी करणे लोकांसाठी फायद्याची डील आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना शक्यतो लोकं Flipkart आणि Amazon सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरुन जास्तीत जास्त खरेदी करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्ही या साइटबद्दल अशा देखील बातम्या ऐकल्या असतील की, लोकांनी ऑर्डर केलेली वस्तु वेगळीच होती आणि त्यांना भेटली भलतीच वस्तु. जसे गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला. ज्यामुळे बहुतेक लोकांच्या मनात आता ऑनलाईन शॉपिंग करायची की, नाही? हा मोठा प्रश्न पडला आहे.


जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे शौकीन असाल आणि तुम्हाला अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर Flipkart आणि Amazonवर यासाठी एक चांगला पर्याय आहे. याचा अवलंब करुन तुम्ही या फसवणूकीपासून लांब राहू शकता.


Flipkartच्या 'या' पर्यायासह ऑनलाइन शॉपिंग फसवणूक टाळा


ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon वर फसवणूक टाळण्यासाठी, तुम्ही त्यांचा 'ओपन बॉक्स डीलिव्हरी' पर्याय निवडू शकता जेणेकरून जेव्हाही तुमचे पॅकेज डिलिव्हरी होईल तेव्हा तुम्ही ते डिलिव्हरी बॉयसमोर उघडू शकता आणि तुमचा माल बरोबर आहे की, नाही हे तपासू शकता.


ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय घेणे हे एक चांगले पाऊल आहे, कारण याद्वारे तुम्ही नेहमी तेच ऑर्डर घेऊ शकाल जे तुम्ही ऑर्डर केले होते. ज्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही.


उदाहरणार्थ, Flipkart वर वस्तू तपासल्यानंतर ग्राहक डिलिव्हरी बॉयला ओटीपी देखील देतो, त्यानंतरच डीलिव्हरी यशस्वी मानली जाते. हा OTP फक्त ग्राहकच देऊ शकतो. त्यामुळे जर तुमचे पार्सल बरोबर आले नाही, तर तुम्ही तो ओटीपी डीलिव्हरी बॉयला देऊ नका. तसेच तुम्ही कॅश ऑन डीलिव्हरीचा देखील पर्याय निवडू शकता


फसवणुकीसाठी कोण जबाबदार आहे?


गेल्या काही दिवसांमध्ये, Amazonच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान, अशी अनेक प्रकरणे समोर अली आहेत, जिथे ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरपेक्षा भलतंच काहीतरी मिळालं आहे. अशा परिस्थितीत जर पाहिले तर ही चुक फक्त कंपनीची नाही. कारण कित्येक वेळा असे घडते की, कंपनी योग्य उत्पादन पाठवते पण डीलिव्हरी बॉय यात हेरफेर करतात आणि उत्पादन बदलतात. याचा दोष ते सहजपणे कंपनीवर टाकतात आणि स्वतःला वाचवतात.


तर अशी काही प्रकरणे समोर आले आहेत जिथे तपासणीनंतर असे आढळून आले आहे की, ग्राहकांनी उत्पादन विनामूल्य मिळवण्यासाठी देखील अशा बातम्या पसरवल्या आहेत. त्यामुळे यासाठी फक्त कंपनीलाच दोष देणं योग्य ठरणार नाही. म्हणून तुम्ही स्वत: काळजी घेऊन योग्य पद्धतीने ऑनलाई शॉपिंग करा.