Instagram New Feature : हल्ली दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन दिसतो आणि त्या स्मार्टफोनवर सर्वाधिक वापरलं जाणारा App असतं इन्स्टाग्राम (Instagram). इन्स्टाग्रामनं रील्सचं फिचर सुरु केलं आणि युजर्स या अॅपवर अक्षरश: तुटून पडले. ट्रेंडमध्ये असणारा रील बनवून आपणही ट्रेंडमध्ये येण्यासाठी अनेकांचीच धडपड सुरु झाली. या साऱ्यामध्ये अडचण आली ती म्हणजे रील डाऊनलोड करण्याची. आता मात्र ती अडचणही दूर होणार आहे. कारण, Instagram च्या नव्या फिचरमुळं जगभरातील मंडळींना आता सहजपणे रील डाऊनलोड करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेमध्ये हे फिचर यापूर्वीच लाँच करण्यात आलं असून, आता ते इतर ठिकाणी रोलआऊट करण्याता बेत आखण्यात आला आहे. या फिचरमुळं इन्स्टा युजर्स थर्ड पार्टी अॅपशिवाय रील्स डाऊनलोड करू शकणार आहेत. इथं अट फक्त एकच, ते म्हणजे तुम्ही फक्त पब्लिक अकाऊंचवरील रील्सच डाऊनलोड करू शकता. Private Accounts वरील रील्स तुम्हाला डाऊनलोड करता येणार नाहीत. पब्लिक अकाऊंट युजर्सनासुद्धा आपले रील्स डाऊनलोड केले जाऊ नयेत असं वाटक असल्याच हे फिचर बंद ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : आठवड्याच्या शेवटी बातमी पगारवाढीची; सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच 


इन्स्टाग्रामवरील या बदलांविषयी सांगताना एडम मोसेरी यांनी सविस्तर माहिती दिली. 'आता तुम्ही कोणत्याही पब्लिक अकाऊंटवरून हे रील डाऊनलोड करू शकता. इथं तुम्हा ज्या अकाऊंटवरून रील डाऊनलोड केलं आहे तिथं वॉटरमार्क येईल'. इन्स्टाग्रामकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंकर आता सहा महिन्यांपासून अमेरिकेमध्ये वापरात आणण्यात आलेलं हे फिचर आता सगळीकडे वापरात आणलं जाणार आहे. 


राहिला मुद्दा हे फिचर वापरण्याचा तर, सर्वप्रथम इन्स्टाचं अॅप सुरु करा आणि त्यामध्ये रील्सवर टॅप करा. आता रीलमध्येच वर उजव्या कोपऱ्याला तीन टींब दिसतील त्या आयकॉनवर क्लिक करा. तिथं Save it नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करताच रील डाऊनलोड होईल. त्यामुळं आता खुशास ब्राऊज करा, रील्स शेअर करा आणि ट्रेंडिंग रिस्ल डाऊनलोडही कराय तेसुद्धा कोणत्याही अडचणीशिवाय.