GPay: गुगल पेवर मिळेल बक्कळ कॅशबॅक! सोप्या टिप्स करतील तुम्हाला मालामाल
Google Pay Offer : गुगल पेवर तुम्हाला कॅशबॅक मिळत नाही? काळजी कर नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कॅशबॅक मिळवण्याचे चान्सेस वाढू शकतात.
Google Pay Best Reward: सध्याच्या डिजिटल जगात कुणाला GPay माहित नाही किंवा वापरलं नाही असं क्वचितच पाहायला मिळेल. कुणालाही पैसे पाठवायचे असतील किंवा कुणाकडून पैसे घ्यायचे असतील तर आपण चटकन गुगल पेकर असं सांगतो. पटकन होणारे ट्रान्झॅक्शन आणि पैशांच्या सुरक्षित व्यवहारांमुळे Gpay अल्पावधीत लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याचा वापरही वाढला.
अनेकांना GPay वर मिळणाऱ्या कॅशबॅकचं प्रचंड आकर्षण असतं. जरुरी नाही की तुम्हाला वारंवार कॅशबॅक मिळेल. मात्र आम्ही सांगितलेल्या काही ट्रिक्स तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला नक्कीच जास्त कॅशबॅक मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात GPay वर cashback मिळवण्याच्या काही हॅक्स ( Hacks ) बाबत.
वेगवेगळ्या युझर्सला करा पेमेंट
जर तुम्ही एकाच युझरला पैसे पाठवत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला छान कॅशबॅक मिळेल, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरंतर जास्तीत जास्त कॅशबॅक मिळवायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या युझर्सला पैसे पाठवावे लागतील. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या कॅशबॅक रिवॉर्डची शक्यता वाढते.
मोठी रक्कम पाठवणे
जर तुम्ही गुगल पे चा वापर करून 10,000 किंवा 20,000 रुपयांचे ट्रान्झॅक्शन्स करत असाल आणि तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल असं वाटत असेल तर तसं होत नाही. जर तुम्हाला जास्त कॅशबॅक हवा असेल तर 100 ते 1000 रुपयांपर्यंतचे जास्त पेमेंट्स करावे लागतील. अशाने तुम्हाला जास्त कॅशबॅक मिळू शकतो.
ऑफर्समध्ये सहभाग वाढवा
गुगल पेमेंटवर विविध ऑफर्स कायम येत असतात. ज्यांचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकतात. जर तुम्हाला चांगला कॅशबॅक हवा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑफर्समध्ये भाग घेणं गरजेचं आहे. अशाने तुम्हाला कॅशबॅक मिळण्याची शक्त्यात वाढते.
( विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
how to earn maximum cashback on google pay tips and tricks