इंस्टाग्रामदेखील बनू शकतं उत्त्पन्नाचं साधन
आजकाल सोशल मीडिया केवळ जगभरातील लोकांशी कनेक्ट होण्याचं माध्यम राहिलेलं नाही.
मुंबई : आजकाल सोशल मीडिया केवळ जगभरातील लोकांशी कनेक्ट होण्याचं माध्यम राहिलेलं नाही.
आता गूगल, फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर स्मार्टली केल्यास हीच माध्यमं आता उत्तपनाची साधनं होऊ शकतात.
इंस्टाग्रामवर तुमचा प्रोफाईल फोटो आणि बायो दमदार असेल तर तुम्हांला तुमचे फॉलोवर्स वाढवायला मदत होते. बस्सं इंस्टाग्रामवरून उत्पन्न मिळवण्यासाठी या दोन गोष्टी म्हणजे पहिली पायरी आहे. तुमच्या फॉलोवर्सची संख्या जितकी जास्त तितकी तुमची उत्त्पन्न कमवण्याची संधी वाढते.
तुम्ही किती अॅक्टिव्ह आहात ?
दमदार प्रोफाईल पिक्चरसोबत तुम्ही किती इंस्टाग्रामवर किती अॅक्टिव्ह आहात ? हेदेखील पाहिले जाते. तुमच्या फॉलोवर्ससोबत आणि इंस्टाग्रामवरील इतर युजर्ससोबत सतत संपर्कामध्ये राहण्यासाठी तुम्हांला अकाऊंट बनवल्यानंतर चांगल्या दर्जाचे फोटो अपलोड करणं गरजेचे आहे.
कसा असावा फोटो ?
तुम्ही जितके चांगले फोटो अपलोड कराल तितका तुम्ही युजर्सवर अधिक प्रभाव पाडण्यास यशस्वी ठरू शकता. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य हॅशटॅगचा वापर करणं आवश्यक आहे. तुमच्या फॉलोवर्ससोबत एंगेजमेंट वाढवण्यासाठी त्यांचे फोटो लाईक करा, कमेंट करा
इंस्टाग्रामवर कमाई कशी कराल ?
चांगला फोटो, फॉलोवर्ससोबत एंगेजमेंट हा सोशल मीडियात अॅक्टीव्ह राहण्याचा एक भाग झाला. पण त्यातून उत्त्पन्न कसे मिळणार ? हा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असेल. मग ही कन्सेप्ट ब्लॉगिंगसारखी आहे. तुमचे फॉलोवर्स लाखोंवर गेले की तुम्ही पार्टनर किंवा क्लायंटची सर्व्हिस प्रमोट करण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्हांला क्लायंटचे पॉझिटीव्ह प्रमोशन करायचे असते.
स्पॉन्सर पोस्ट
फेसबुकप्रमाणेच ही सोय केवळ व्हेरिफाईड आणि VIP अकाउंटसाठी चांगले काम करते. याकरिता तुमच्याकडे फॉलिवर्स अधिक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हांला क्लायंट किंवा विशिष्ट कंपनीला प्रमोट करण्याची संधी मिळते.
ऑनलाईन विक्री
तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुमचे फोटो कोणत्याही गॅलरीत नाहीत तर चक्क ऑनलाईनआणि घरबसल्या विकू शकता. याकरिता वॉटरमार्क टाकून तुम्ही फोटो अपलोड करू शकता. फोटोची किंमत, त्याबाबतची माहिती बायोमध्ये लिहून ठेवा. तसेच विक्रीसाठी खुले असलेले फोटो व त्यांची माहिती द्या.
इंस्टाग्राम अकाऊंट सेल करा
तुमच्याकडे खूप फॉलोवर्स आहेत पण त्यांच्याकडे पहायला, सांभाळायला वेळ नसेल तर तुम्ही अकाऊंट विकू शकता. Famewap सारख्या अनेक वेबसाईटवर तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंट विकू शकता .