तुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? `या` स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य
खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.
मुंबई : आजच्या काळात क्वचितच असा कोणी व्यक्ती असेल ज्याच्याकडे स्मार्टफोन नसेल. तसे पाहाता स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे, ज्याच्याशिवाय आपलं आपलं कोणतंच काम होत नाही. याचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा देखील आहे. कारण यामुळे आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. इतकंच नाही तर यामुळे आपले पैसे देखील चोरीला जाऊ शकतात किंवा आपली फसवणूक होऊ शकते.
खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.
म्हणूनच फोन वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे जास्त गरजेचं आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या स्टेप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही जाणून घेऊ शकता की, कोणते स्मार्टफोन अॅप्स तुमची हेरगिरी करत आहेत. जेणे करुन तुम्ही यापासून वाचू शकता.
ही ट्रिक आयफोन युजर्ससाठी कामाची आहे.
तुम्ही नुकतेच जर तुमच्या आयफोन एखादे ऍप डाऊनलोड केले, तर ते ऍप तुम्हाला पॉप-अपवर तुमची परवानगी विचारतात. तर तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही तर असे ऍप्स तुम्हाला ट्रॅक करणार नाही. ज्यामुळे तुमची माहिती सेफ राहिल.
अॅप तुमच्या फोनमधून काय आणि कसे ट्रॅक करते? ते जाणून घ्या.
ऍपला तुमचा मागोवा घेण्याची परवानगी असल्यास, ते तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटी, तुमची इंटरनेट हालचाल आणि तुम्ही इतर ऍप्ससोबत कोणते संवाद साधता याचा मागोवा घेते. अशा प्रकारे, ते तुम्हाला त्याच संदर्भात गोष्टी जाणून घेण्यात मदत करतात किंवा जाहिराती देखील दाखवतात.
कोणते ऍप्स तुमचा मागोवा घेत आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या iPhone चे सेटिंग ऍप उघडणे आवश्यक आहे. हे केल्यानंतर तुम्ही थोडेसे स्क्रोल केल्यावर तुम्हाला 'बॅटरी' पर्यायाच्या खाली 'प्रायव्हसी' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर दुसरा मेनू उघडेल.
तुमच्या स्क्रीनवर 'प्रायव्हसी' मध्ये उघडणाऱ्या मेनूमध्ये, 'लोकेशन सर्व्हिसेस' अंतर्गत, तुम्हाला 'ट्रॅकिंग'चा पर्याय दिसेल, जो दुसरा पर्याय आहे.
तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, तुम्हाला स्क्रीनच्या शीर्षस्थानी 'Allow Apps to Track' हा पर्याय दिसेल, जो तुम्हाला चालू ठेवावा लागेल. आता तळाशी तुम्हाला तुमच्या सर्व अॅप्सची सूची दिसेल आणि तुमचा मागोवा घेत असलेल्या अॅप्सच्या पुढील टॉगल हिरवा रंग असेल.
तेथून तुम्हाला कळेल की कोणते ऍप तुमची एक्टिव्हिटी फॉलो करत आहेत.
ऍप्सना तुमचा मागोवा घेऊ देऊ नका
तुम्ही ट्रॅकिंग अॅक्सेस परत घेण्यासाठी तुमच्या सूचीमध्ये तुमचा मागोवा घेणारे अॅप्स निवडू शकता. त्यानंतर तुम्ही ते अॅप्स टॉगल करू शकता आणि त्यांना तुमचा मागोवा घेण्यापासून त्यांना थांबवू शकता. अशा प्रकारे तुम्ही केवळ कोणते अॅप्स तुमचा मागोवा घेत आहेत हे शोधू शकत नाही, तर तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही अॅप्सचा ट्रॅकिंग ऍक्सेस बंद करू शकता.