मुंबई : आधार कार्ड पॅनकार्डप्रमाणेच मोबाईल क्रमांक आणि बॅंक खात्यासोबत लिंक करावे असा सरकारचा आदेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ डिसेंबरपर्यंत बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक न झाल्यास तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन होणार नाही, त्यामुळे वेळेत आधारकार्ड लिंक करा असे आवाहन सरकारकडून दिली आहे. पण तुमचे आधारकार्ड लिंक झाले आहे की नाही ? हे तुम्हांला नेमके समजणार कसे ? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आता हे अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. 


सिक्रेट कोड  देणार माहिती 


आधार कार्ड तुमच्या बॅंक खात्याशी लिंक झाले की नाही ? याची माहिती देण्यासाठी एका खास सिक्रेट कोड आहे. तुमच्या फोनमध्ये हा कोड डाएल केल्यास तुमच्या मोबाईल स्क्रिनवर सारी माहिती दिसेल. या कोडला पहणं अगदी सोप्प आहे. 


सिक्रेट कोडने कसे ओळखाल ? 


तुमच्या मोबाईलवरून  *99*99# कोड डायल करा. ( ही सुविधा तुम्ही आधारकार्डच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेल्या मोबाईल क्रमांकासाठी उपलब्ध आहे) 


स्क्रीनवर काही सूचना येतील. त्यानुसार तुम्हांला पुढील माहितीसाठी १ क्रमांक लिहून मेसेज पाठवावा लागेल. 
त्यानंतर १२ आकडी आधारकार्ड क्रमांक दिला जाईल.


तुमचा क्रमांक बॅंक खात्याशी लिंक आहे की नाही हे त्यानंतर मोबाईल स्क्रिनवर समजेल. 


लास्ट अपडेटची माहितीदेखील दाखवली जाईल. 


१ डिसेंबरपासून सुरू होईल प्रोसेस 


मोबाईल आणि आधार कार्डाचं लिकिंगदेखील ऑनलाईंच्या स्वरूपात करता येणं सुकर होणार आहे. 1 डिसेंबरपासून तुम्ही घरबसल्या लिकिंग करू शकता. मोबाईल आणि आधारकार्डाच्या लिकिंगसाठी  ८ फेब्रुवारी २०१८ ही तारीख अंतिम असेल. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डाशी लिंक नसल्यास तो डिएक्टिव्हेट होईल.